Top News

गायीवर हल्ला करून केले जागीच ठार तर गोरा गंभीर जखमी

गायीवर हल्ला करून केले जागीच ठार तर गोरा गंभीर जखमी


 गोवरी एक्स्टेंशन माईन्स-1 एरियात वाघाचा शिरकाव


वाघाचा बंदोबस्त करा राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची मागणी



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


तालुक्यातील गोवरी माईन्स एक्स्टेंशन 1 मध्ये वाघाने हल्ला करून गायीला जागीच ठार केले.तर एक गोरा गंभीर जखमी झाला असून परिसरात दहशत पसरली आहे.बाबापूर येथील शेतकरी मनोहर करडभूजे यांची गाय असून मानोली येथील भास्कर मोरे यांच्या गोऱ्याला गंभीर जखमी केले.


विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलवले आणि शिवारात कॅमेरे लावून घेऊन वाघाचा बंदोबस्त करणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना नेत्यांनी वेकोली मॅनेजर सबेरिया साहेबांना रस्त्यावरील काटेरी वनाची साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली.


याप्रसंगी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश झाडे, माजी ग्राप सदस्य अमोल कोसूरकर, जेष्ठ शिवसैनिक प्रदीप येनूरकर, समाधान करडभूजे आणि बाबापूर मानोली येथील नागरिक उपस्थित होते.



सर्पमीत्र रवी शेनकुळे यांच्या क्यामेरात कैद‌झाले अत्यंत दुर्मीळ दृष्य.....नागाने गीळले वायपर साप....👇






Previous Post Next Post