Top News

बल्लारशाह शहरातील विद्यानगर वार्डात आनखी एकाची आत्महत्या.

बल्लारशाह शहरातील विद्यानगर वार्डात आनखी एकाची आत्महत्या.


20 वर्षिय अनिल ने गळफास घेऊन केली आत्महत्या




विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

बल्लारशाह शहरातील‌ टेकडी विभागात हलीच काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातील ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच 

पुन्हा विद्यनगर वार्डातील पंचशिल चौक या परीसरा मध्ये रहानार्या अनिल नारायण देवगळे या 20 वर्षीय यूवकाने गळफास लाऊन‌ आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळि 6:30 च्या सुमारास घडली आहे.

सदर युवकाने राहते घरीच गळफास लाऊन‌ आत्महत्या केली आहे, अनिल हा मोल मजुरी करीत होता, सद्या 3 महीन्या पासुन काम धंदा काही नसल्याने तो घरीच होता.

अनिल हा नारायण देवगळे यांचा तिसर्या नंबरचा मुलगा आहे अनिल हा महीनती आनी होतकरु मुलगा होता त्याच्या जान्याने देवगळे कुटुंबीयांनवर दु:खा चे संकट कोसळले आहे.घटनेचा अधीक तपास बल्लारशाह पोलीस करीत आहे.

Previous Post Next Post