15 ऑगस्टला शिक्षक सुशीलकुमार पावरा यांचे 150 वे उपोषण
विदर्भ माझा न्युज 24 - रत्नागिरी
आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी सतत एकाकी लढा देणारे शिक्षक सुशीलकुमार पावरा यांचे 15 ऑगस्ट 2021 रोजी दापोली तहसील कार्यालय समोर 150 वे उपोषण होणार आहे. याबाबतचे निवेदन शिक्षक सुशीलकुमार पावरा यांनी तहसीलदार दापोली व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे.
दोषी, भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारक,षडयंत्रकारी व बोगस डिग्री धारक अधिका-यांवर बडतर्फीची कारवाई करा,माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा व इतर 25 मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे हे 150 वे उपोषण होणार आहे. आपल्या मागण्यांसाठी शिक्षक सुशीलकुमार यांचे उपोषणाचे सत्र अजूनही सुरूच आहे.
2 लाख दंड आपल्या प्रकरणात जिल्हा परिषद रत्नागिरीला झालेला आहे .आपल्या प्रकरणात मंत्री व राजकीय पदाधिकारी यांचा राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे अद्याप बोगस व दोषी अधिका-यांवर कारवाई झाली नाही व मलाही न्याय मिळण्यास दिरंगाई होत आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे माझ्या प्रकरणाकडे व उपोषणांकडे लक्ष आहे.त्यामुळे मला कधी ना कधी न्याय मिळेलच,अशी आशा आहे. मी कधीच हार मानणार नाही,असाच सातत्याने लढा सुरू ठेवणार आहे. कारण तरूण पिढी मला आदर्श मानत आहेत. म्हणून कितीही संकटे आली तरी आपण लढतच राहायचे ही प्रेरणा मी भावी पिढीला देऊ इच्छित आहे.म्हणून मी लोकशाही मार्गाने लढतच राहणार आहे.
सत्याचा नेहमीच विजय होत असतो.मला ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी सामान्य माणसाचा, सामान्य जनतेचा विजय होईल.गांधी वादी मार्गाने न्याय मिळण्यास उशीर लागतो,तरी मी संयमाने उपोषण करत राहणार आहे.मला न्याय मिळेल, मी न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.150 वेळा उपोषण करूनही मला न्याय मिळाला नाही तरी मी भावी पिढीला लढण्याचा एक चांगला संदेश देईन. याचा मला आनंद आहे. अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.


