संजय डुंबेरे यांच्या साॅ मिलच्या जुन्या गोडामाची भिंत कोसळली...मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान
बल्लारशाह शहरात 68 वर्षीय महीलेचा भिंत कोसळल्याने मृत्यू..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
मागील 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्हा सह बल्लारशाह शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारशाह शहरातील शिवाजी वॉर्ड येथील महात्मा जोतीबा फुले महावीद्यलय समोरील श्री संजय राजाराम डुंबेरे यांच्या साॅ मिल मधे असलेल्या जुन्या गोडामाची भिंत कोसळली बाजूच्या इमारती मधील वास्तव्यास असलेली श्रीमती मिराबाई कटकंदिवार वय-६८ वर्ष यांचा भिंत कोसळल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार सदर घटना आज रात्री 12:30 च्या दरम्यान घडली असून या घटनेचे वृत्त कळताच बल्लारशाहचे तहसीलदार संजय राईचंवार, पोलीस उपनिरीक्षक तिवारी, तलाठी खरुले, अजय मेक्कलवार ज्येष्ठ सहायक, संजय डुंबेरे, विशाल डुंबेरे, सामाजिक कार्यकर्ता व नगर सुरक्षा दल ची टीम उपस्थित होती. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेच्या पश्चात पती व दोन मुले आहे. तर बल्लारशाह शहराचे एतीहासीक वैभव बल्लारशाह कील्ल्यचे बुरूज ढासळल्याने दादाजी पाटील यांच्या घराची संवरक्षन भिंत तुटली आहे,सुदैवाने या घटनेत कुनासही हानी झाली नाही.


