Top News

फुलबाश धांडे यांची बिरसा फायटर्स अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

फुलबाश धांडे यांची बिरसा फायटर्स अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड 

 


विदर्भ माझा न्युज 24 - अमरावती 

फुलबाश धांडे  यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष  पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय  अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21/07/2021 रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत  राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी फुलबाश धांडे  यांची अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले. तत्पूर्वी फुलबाश धांडे  यांनी   बिरसा फायटर्स  संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे राज्य उपाध्यक्ष राजेश धुर्वे यांनी सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांना कळवले. त्यावरून त्यांची  समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना अमरावती  जिल्ह्यात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

            फुलबाश धांडे  यांची अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड  झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव  राजेंद्र पाडवी,महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष,प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख,गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार,जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.फुलबाश धांडे  यांची अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष   पदी निवड झाल्याबद्दल सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देणा-या सर्व मित्रांचे फुलबाश धांडे  यांनी आभार मानले आहेत.

          आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त अमरावती  जिल्हा कार्याध्यक्ष फुलबाश धांडे यांनी सांगितले.

Previous Post Next Post