Top News

राजुरा तालुक्यातील हिरापुर, साखरी, चिंचोली या गावांना नाल्यामुळे आलेल्या पुरचा मोठा फटका...

राजुरा तालुक्यातील हिरापुर,  साखरी, चिंचोली या गावांना नाल्यामुळे आलेल्या पुरचा मोठा फटका...


नाल्या लगत शेतकऱ्याचे मोठे नुकसान...


कापूस ,सोयाबीन ,तूर पीक उद्धवस्त...



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


चंद्रपुर(चांदागड) जिल्हातील राजुरा तालुक्यात व इतर भागात काल पासून पडत असलेल्या पावसाने अतिवृष्टी धारण केली आहे ,नदी ,नाले तुडुंब भरून वाहू लागले काल दुपार पासून पावसाने जोर पकडला आणि आज दिवभर पाणीच पाणी पडत असून नदी नाले भरून वाहू लागले. अनेक ठिकाणी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे,नदी नाल्यामध्ये जनावरे ,बकऱ्या,काही ठिकाणी मनुष्य वाहून गेल्याचे कळत आहे.

सतत पडणाऱ्या पावसाने आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे ,जिकडे तिकडे पाणी  साचले असून यात कापूस ,सोयाबीन ,तूर,पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले,कोरोना मुळे नुकसान भोगावे लागले आणि आता अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याने करायचे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे .

प्रशासनाने लवकरात लवकर  पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी शेतकरी वर्गात चर्चा पहावयास मिळत आहे.

Previous Post Next Post