महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुल तालुका शिवसेनेतर्फे गरजुना मदतीचा हात...
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
कोकण ,पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अतिवृष्टी व महापुराने झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता , नेहमीच्या निकषांपलीकडे जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेत आहे तसेच पुराचा सातत्याने धोका काही जिल्हामध्ये सातत्याने पुर येत आहे पूररेषा वारंवार ओलांडणाऱ्या नद्यांपैकी गाव व संरक्षक भिंती मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्णायक कामे सुरू आहे त्याअनुषंगाने आज 27 जुलै ला प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या उत्साहात शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस साजरा करतात परंतु पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार कोणतेही समारंभ या महाराष्ट्रात पुर परीस्थितीत करू नये जर वाढदिवस साजरा करायचे असल्यास पूरग्रस्ताना मदत तसेच बेरोजगार , शेतकरी बांधव यांना एक हात मदतीचा द्या असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते त्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी आज वाढदिवसाचे औचित्य साधून मुल तालुक्यातील गरजुना मदतीचा हात या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्यामध्ये मुल येथील सोमनाथ रोड स्थित बेरोजगार अजय ठाकुरवार एक मोडक्या स्वरूपाचा चहा दुकान चालवित होता तसेस केरोसिन बंद झाल्यामुळे स्टो मध्ये हल्ली डीझेल टाकुन आपली रोजी कशीबशी काढत होता परंतु वाढते डिझेल चे भाव गगनाला भेदुन गेल्यावर मात्र अजयची कसरत झाली जिवन कसे जगावे हे समजत नव्हते त्याबरोबर पत्नी व मुलाबाळाच्या पालनपोषण कसे करावे ह्या चिंतेने ग्रासून जायचा ही बाब मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांच्या लक्षात आली त्यांनी अजय चे दुःख समजुन घेत आपल्या स्वखर्चाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य गरजुना मदत या आवाहनाला प्रतिसाद देत मुल शिवसेना तालुका प्रमुख यांनी मुल येथील गरीब परिस्थितीत जगणारे अजय ठाकुरवार यांना चहा स्टाॅल चे सामान यामध्ये चहा टपरी, सिलेंडर,रेग्युलेटर,लायटर,भांडे,चहा,साखर तसेच संपुर्ण साहीत्य येरोजवार यांनी दिले तसेच मुल तालुक्यातील गरजु शेतकरीवर्ग यांना खताचे वाटप करण्यात आले सर्व गरजवंताला मदत करण्यात आली त्या सर्वानी मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन येरोजवार यांचे आभार मानले या कार्यक्रमाला यशस्वी पणे राबविण्यात तालुका समन्वयक तथा सुशी सरपंच अनिल सोनुले , उपतालुकाप्रमुख रवी शेरकी , सत्यनारायण अमरूदिवार, मा.ता.प्र. सुनिल काळे, महेश चौधरी, शहर समन्वयक अरविंद करपे ,शहर प्रमुख राहुल महाजनवार, युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे, युवासेना सरचिटणीस सिन्नु कन्नुरवार,आशिष गुंडोजवार उपस्थित होते.
