सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ बाईक रॅली सह असंख्य कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग
(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनिधी),मनोज श्रिहरी गोरे, राजुरा :-
भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ पुकारलेल्या आंदोलनात राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चौक येथून बाईक रॅली काढून बामणी फाटा टी पाईंट या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रॅलीत युवक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.यावेळी भाजपचे पदाधिकारी अरुण मस्की, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, सचिन डोहे, दिलीप वांढरे, वाघुजी गेडाम, भाऊराव चंदनखेडे, संदीप गायकवाड, कैलास कार्लेकर यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरण कारणीभूत असून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ भाजपच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून राजुरा शहरातील मुख्य बाजार पेठ येथून बाईक रॅली काढून बामणी फाटा येथे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज (दि. २६) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी यानंतर मोठ्याप्रमाणात ओबीसी हक्काचे आंदोलन करण्यासाठी रणनीती आखणार असल्याचे सांगितले असून यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
बामणी फाट्यावरील आंदोलनात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते चांदनसिंग चंदेल, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, बल्लारशाह चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे,तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, शहर अध्यक्ष काशीसिंग, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा महिला अध्यक्षा अल्का आत्राम, रेणुका दुधे, निलेश खरबडे व तालुका जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


