विराआंस उतरनार नागपूर महानगर पालिका निवडणूकीत?
9 ऑगस्टला वीज व विदर्भासाठी मोठ्या आंदोलनाचे नियोजन...
27 जूनच्या राज्य कार्यकारिणीत होनार अंतीम निर्णयाची घोषना - राम नेवले,मुख्यसंयोज
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर शहर पदाधिकारी यांची बैठक दि. 20 जूनला दु. 1 वाजता समितीचे मुख्यालय 214, गीरीपेठ, नागपूर येथे झाली. विदर्भ आंदोलनाचे नेते राम नेवले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रंजना मामर्डे व युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे 9 ऑगस्टला “वीज व विदर्भाचे मोठे आंदोलनाची” तैय्यारी सुरू झाली आहे त्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. गेल्या दिड वर्षापासून कोरोनाची महामारी सुरू झाली तेव्हापासून लोकांचे रोजगार गेले, व्यापार बंद, उद्योग बंदी आदी कारणामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली, लोकांकडे पैसाच उरला नाही म्हणून कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल विदर्भातील जनतेचे सरकारने भरावे, 200 युनिट फ्री करावे, त्यानंतरचे वीज बिल निम्मे करा, शेती पंपाचे वीज बिल माफ करा यासाठी वीज आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना काळातील वीज बिल माफ करणार नाही ते भरावेच लागेल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला व ज्यांनी बिल भरले नाही त्यांचे कनेक्शन कापा असा आदेश नितीन राऊत यांनी दिला आहे. जनतेचे प्रश्न न सोडविता, जनतेच्या समस्या न सोडविता त्यांचे वीज कनेक्शन कापा ही हिटलशाही भाषा नितीन राऊत वापरत असून व सत्तेचा माज त्यांना आला असेल तर ती जनता त्यांचा माज उतरविल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्या उत्तर नागपूर या मतदार संघामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती आपले लक्ष केंद्रित करणार आहे व ज्यांचे कनेक्शन कापतील त्यांच्या बाजूने समिती ठामपणे उभे राहणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती पुढील येणार्या निवडणूकी अगोदर म्हणजे 2023 च्या अगोदर भाजपाच्या केंद्र सरकारने जाहीर करावी अन्यथा विदर्भाच्या लोकांना विदर्भ देतो म्हणून तुम्ही फसविले आहे विदर्भातून पूर्णपणे सफाया करा यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती पूर्ण ताकतीने प्रचार करेल असेही बैठकीत ठरले. त्यासाठी 9 ऑगस्टला क्रांती दिनापासून होणार्या या मोठ्या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले व त्याची घोषणा 27 जूनला नागपूरला होणार्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात येणार आहे असे राम नेवले यांनी सांगीतले.
तसेच नागपूर महानगर पालिकेत सध्या भाजपाची सत्ता असून येथे जनतेचे प्रश्न सोडविल्याच जात नाही ही सत्ता फक्त भाजपाच्या नेत्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठीच वापरण्यात येते, येथे जनतेचे प्रश्न सोडविल्याच जात नाही असा जनतेचा अनुभव आहे व जनता यांना त्रस्त झाली आहे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने या महानगर पालीकेच्या निवडणूका लढवायला पाहीजे असा पदाधिकारी यांचा सुर होता व महानगर पालीका निवडणूका लढवून नागपूर शहर विदर्भ राज्य आंदोलन समितीने आदर्श बनवावे असेही कार्यकर्ते म्हणाले याचा ही अंतीम निर्णय 27 जूनच्या राज्य कार्यकारिणीत घेतला जाईल असे राम नेवले यांनी सांगीतले.
महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे व युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी मार्गदर्शन केले.तात्यासाहेब मत्ते, रेखा निमजे, विष्णू आष्टीकर, अरुण केदार, सुनिता येरणे, राजेंद्र सतई, ज्योती खांडेकर, नरेश निमजे, गुलाबराव धांडे, विणा भोयर, संगीता अंबारे, जया चातूरकर, प्रदिप सिरसकर, सविता कुळकर्णी, अजय सिरसवार, नितीन अवस्थी, शोभा येवले, शैलेष धर्माधिकारी, अन्नाजी राजेधर, अतुल रणदिवे, प्रदिप देशपांडे, अॅड. शादाब खातीब, सचिन लोणकर, मयुर पौनीकर, नरेंद्र वाघाडे, करूणा ढवळे, आदी उपस्थित होते आणि यांनी चर्चेत भाग घेतला.सविता कुळकर्णी यांची नागपूर शहर महिला आघाडी महासचिव म्हणून निवड करण्यात आली.
