भाजप तर्फे बामणी फाट्यावर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह :-
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणामध्ये या पंधरा महिन्यात काहीच लक्ष दिले नाही, वकिलांची फौज उभी केली नाही तसेच ओबीसींचा एम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारने केलेले नाही याऊलट केंद्राकडे बोट दाखवुन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे राज्यातील शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार करत आहे, राज्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत ठेवण्याकरिता महाराष्ट्राचे लोकनेते सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या सूचने नुसार भारतीय जनता पार्टीकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या मध्ये बल्लारशाह व राजूरा विधानसभेतील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शेकडो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत बल्लारशाह तालुक्यातील बामणी फाट्यावर हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, बल्लारशाह चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार संजयजी धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य रेणुका दुधे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष राजू दारी,भाजपाचे मंडळ अध्यक्ष काशिनाथ सिंह,भाजपाचे शहर सचिव इंजी. देवेंद्र वाटकर,
किशोर पंदीलवार, प्रभाकर भोयर, ज्येष्ठ नेता निलेश खरबडे,सतीश धोटे, अरुण मस्की, नारायण हिवरकर, चंदू मारगोणवार, केशव गिरमा, सुनील उरकुडे, चेतन गौर, सुरेश केंद्रे,निलेश संगमवार, अजित मंगळगिरीवार, नंदू रणदिवे,सचिन डोहे, राकेश पुन, ओम पवार, मोहन चलाख, महेंद्र करकाडे, अश्विन कुसनाके, निलेश फुलगमवार,गोविंदा पोडे, मनीष वासमवार, गोपीनाथ चव्हाण, अमोल चूधरी, प्रशांत समर्थ, विनोद सिडाम, ऋषी कोटरंगे, बंडू बुरांडे, ईश्वर नेताम, मोरेश्वर उदिसे, सोमेश्वर पद्मगिरवार,
विनोद देशमुख, प्रकाश मोडपल्लीवार, महादेव तपासे विनायक देशमुख, नाना येल्लेवार, दिलीप वांढरे, वैशाली जोशी सभापती येलैया दासरफ,नगरसेविका पुनम मोडक, सारिका कणकम, सुवर्णा भटारकर, कांताताई ढोके, आरती ताई आक्केवार, वर्षा लोनबळे, सतिष कणकम, अरुण भटारकर,संजय बाचपेई,प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी, राजेश कैथवास, मनीष रमिल्ला, संदीप गायकवाड,आदित्य शिंगाडे, शुभम बहुरिया,मनीष पोडशेट्टीवार आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.




