Top News

This is not just my honor but the honor of the entire life-giving blood donation committee Ballarshah - Eng. Devendra Watkar.

हा फक्त माझा सत्कार नसून संपूर्ण जीवनदान रक्तदायिनी समिती बल्लारशाह चा सत्कार आहे -  इंजि.देवेंद्र वाटकर  



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

       जागतीक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वैच्छिक रक्तदान चळवळीस प्रेरक रक्तदाते व रक्तदान शिबीर आयोजक संस्थांचा भव्य सत्कार समारंभ आज दि.१८/०६/२०२१  रोज शुक्रवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. मागील अनेक वर्षापासून आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व भाजपा ज्येष्ठ नेता वनविकास महामंडळ, महाराष्ट्र राज्यचे माजी अध्यक्ष  चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवस निमित्त दि.०७ एप्रिल ला जीवनदान रक्तदायीनी समिती, बल्लारशाह च्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केल्या जाते.या शिबिरात बल्लारशाह शहरातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातून रक्तदाते आपल्या स्वइच्छेने मोठ्या संख्येने रक्तदान करतात. या कोरोना महामारी च्या कठीण काळात देखील हे रक्तदान शिबिर कोरोना नियमांच्या अधीन राहून उत्स्फूर्तपणे पार पडले. हे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शहराचे नगराध्यक्ष हरीश शर्मा,भाजपा - शहराध्यक्ष  काशिनाथ सिंह, भाजपा नेते  शिवचंद दिवेदी, श्री निलेश खरबडे,  समीर केने, रेणुका दुधे,मीना चौधरी, विश्वजीतसिंह चंदेल, सतविंदरसिंग डारी, येलय्या दासरफ, श्रीनिवास संचूवार, भरतसिंह ठाकुर, गुलशन शर्मा, वैशाली जोशी, कांता ढोके,शहर महामंत्री मनीष पांडे, शहर उपाध्यक्ष  मंजितसिंग कालरा, राजू दासरवार, शहर सचिव इंजि. देवेंद्र वाटकर, सतीश कणकम, युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. रनंजय सिंह,भाजपा नगरसेवक व नगरसेविका  सुवर्णा भटारकर, जयश्री मोहुर्ले,  आशा संगीडवार,  सारिका कणकम, पुनम मोडक,  साखरा बेगम,महेंद्र ढोके,  गणेश बहुरिया, राकेश यादव, स्वामी रायबरम, युवा नेते  किशोर मोहुरले, विकास दुपारे ,अरून भटारकर,  शिवभोला खेंगर,  बिरेंद्र श्रीवास,  नरेश बहुरिया,  नीरज झाडे, रोहन तोकल, प्रमोद रामिल्लावार, सुरेन्द्रसिंह खडका, प्रभदीप सचदेवा, घनश्याम बुरडकर, बबलू गुप्ता , नफीस अन्सारी, सरोज सिंह,  हरीबाबु लंका, विशाल शर्मा, ऋषीपाल गेहलोत, श्रीकांत आंबेकर, सलीम अहमद, आबिद अली, पुनमचंद बहुरिया तथा समस्त भाजपा आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि  कार्यकर्ता मोठ्या प्रमाणावर प्रत्येक वर्षी मेहनत घेतात. 

          आजचा हा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते स्वीकारताना या सगळ्यांची आठवण मनात होती व हा सत्कार एकटा माझा नसून संपूर्ण जीवनदान रक्तदायिनी समितीचा आहे असे माझे ठाम मत आहे. हा सत्कार पूर्णता मी जीवनदान रक्तदायिनी समिती, बल्लारपूर ला समर्पित करतो व भविष्यातही आम्ही हा उपक्रम असाच अविरल राबवत राहू असा विश्वास यावेळी मी व्यक्त करतो. याप्रसंगी या उपक्रमाकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लावणारी मंडळी व समस्त रक्तदात्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

Previous Post Next Post