Top News

9 ऑगस्ट पासून विदर्भभर मोठ्या आंदोलनाची तैय्यारी - राम नेवले

9 ऑगस्ट पासून विदर्भभर मोठ्या आंदोलनाची तैय्यारी - राम नेवले


पेट्रोल,डिझेल,गॅस,दरवाढ त्वरीत मागे घ्या..विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागनी..


विदर्भभर जिल्हा व तालुका स्तरावर निदर्शने व निवेदण आंदोलन संपन्न.




विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर

विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे 16 जूनला संपूर्ण विदर्भभर जिल्हा व तालूका स्तरावर पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंची झालेली दरवाढ विरोधात नारे, निदर्शने व निवेदन आंदोलन करण्यात आले,विदर्भातील 11 ही जिल्ह्यामध्ये व जवळपास 100 तालूक्यांमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी सर्व जिल्हा ठिकाणी जिल्हाधिकारी यांना तर तालूक्याच्या ठिकाणी एस.डी.ओ. किंवा तहसिलदार यांना पेट्रोल-डिझेलच्या जिवघेणी दरवाढ विरोधी निवेदन देऊन नारे निदर्शने केली.  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड.वामनराव चटप,मुख्य संयोजक राम नेवले,महीला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे,श्रिनीवास खांदेवाले,युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष मुकेश मासूलकर,पुर्व विदर्भ उपाध्यक्ष कपील इद्दे, यांच्या नेतृत्वात संपुर्ण विदर्भभर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नांवे निवेदन देण्यात आले असून भाजपा सरकारने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु भाजपाची केंद्रात सरकार आल्यावर डिझेल-पेट्रोल-गॅस यांचे भाव तर आसमानाला भिडले आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. काँग्रेस सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात मोदीजी व त्यांचे नेते यांची भाषणे यांची महागाई विरोधातील आंदोलने बघा व आता त्यांच्या सरकारने सामान्य जनतेच्या खिशातून पेट्रोल-डिझेलचे दुपट्टीने रक्कम लुटली असून जनतेचे जगणे मुश्कील केले आहे अशी आज परिस्थिती तय्यार केली आहे.ही जिवघेणी पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा करीता विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विदर्भभर 16 जूनला महागाई विरोधात आंदोलन करण्यात  आले.



             चांदागड(चंद्रपुर) येथे निवेदन देताना




बल्लारशाह येथे निवेदन देताना


अहेरी येथे निवेदन देताना

ब्रम्हपूरी येथे निवेदन

अकोला येथे निवेदन देताना

अचलपुर येथे निवेदन देताना

पूसद येथे निवेदन देताना

वर्धा येथे निवेदन देताना

वणी येथे निवेदन देताना

वडसा येथे निवेदन देताना

पुलगाव येथे निवेदन देताना

वाशिम येथे निवेदन देताना

दर्यापूर येथे निवेदन देताना

देवळी येथे निवेदन देताना 


ब्रम्हपूरी येथे निवेदन देताना

 
तिरोडा येथे निवेदन देताना 

गोंदीया येथे निवेदन देताना 

हिंगना येथे निवेदन देताना 

Previous Post Next Post