Top News

लाखोंच्या BROWN SUGAR सह तिघांना अटक...

 लाखोंच्या BROWN SUGAR सह तिघांना अटक...



विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

  मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी मोहिम सुरु आहे. दुसरीकडे नागपुरातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी दोन ड्रग्ज तस्करांना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळे संपूर्ण नागपुरात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. नागपूरच्या रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पोलिसांना काळ्या रंगाची एक बेवारस बॅग सापडली. या बॅगेत जवळपास 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचे Drug सापडले आहेत. विशेष म्हणजे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत‌.

नेमकं काय आहे हे प्रकरण?


नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या डी-1 कोचमध्ये एक बेवारस काळ्या रंगाची बॅग सापडली. इतर प्रवाशांच्या माहितीनंतर आरपीएफच्या पथकाने ती बॅग जप्त केली. तपासाअंतर्गत त्या बॅगमध्ये Brown sugar(Drug) असल्याचं निष्पन्न झालं. बॅगमध्ये Brown sugarच्या छोट्या-छोट्या 310 पुड्या आढळून आल्या. या पुड्यांचं वजन 21.490 ग्रॅम इतकं आहे. त्याची किंमत 21 लाख 4900 इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. 

लोहमार्ग पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली.

लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नागपूरहून गोंदियाला ही तस्करी केली जायची. नागपूरमध्ये वास्तव्यास असलेला आरोपी प्रकाश कोदरलीकर हा गोंदियामध्ये व्यवसाय करणारी महिला ज्योती करियार हिला Brown sugar पुरवीत होता. ज्योतीने अर्षद नामक व्यक्तीला तस्करीच्या कामासाठी ठेवलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे बस आणि रेल्वे बंद असल्याने त्यांच्या व्यवसायाला फटका बसला होता.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

रेल्वे सूरु झाल्यानंतर ज्योतीच्या आदेशावरून अर्षद महाराष्ट्र एक्सप्रेसमधून Brown sugarची तस्करी करू लागला होता. मात्र, या तस्करीबात रेल्वे पोलिसांना गुपित माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अर्षदची सखोल चौकशी केली तेव्हा प्रकाश कोदरलीकर आणि ज्योती करियार या दोन तस्कारांची नाव पुढे आली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Previous Post Next Post