Top News

Mann_Ki_Baat_program_was_held_in_the presence_of _X-MLA_Sudarshan_Nimkar.

 मन की बात" चा कार्यक्रम माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत " संपन्न.



(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी)मनोज श्रिहरी गोरे, राजुरा :- 

          चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार आज दि.27.06.2021 रोज शनिवार ला 11.00 वा. चुनाळा ता. राजुरा येथे बूथ स्तरीय कार्यकर्ते व नागरिकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 78 व्या "मण की बात" या कार्यक्रमाचे प्रसारण दाखविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर होते, प्रमुख उपस्थिती भाजप चे जिल्हा सचिव तथा ग्रा. पं. खमोना चे सरपंच हरिदास झाडे, चुनाळा ग्रा. पं. सरपंच बाळू वडस्कर, ग्रा. पं. माजी सरपंच संजय पावडे, भाजप चे कार्यकर्ते नितीन बाम्बरटकर व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप चे शक्तिकेंद्र प्रमुख तथा ग्रा.पं. चुनाळा चे सरपंच बाळू वडस्कर यांनी केले.मन या कार्यक्रमानिमित्त आमदार सुदर्शन निमकर यांनी मा. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाबद्धल विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहिल्या बध्दल बाळू वडस्कर यांनी त्यांचे आभार मानले.

Previous Post Next Post