Top News

पंचायत समिती ब्रह्मपुरी, पंचायत स्तर अंतर्गत,विविध कामांचे भूमीपुजन संपन्न

 पंचायत समिती ब्रह्मपुरी, पंचायत स्तर अंतर्गत,विविध कामांचे भूमीपुजन संपन्न



विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी

पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यात विविध ठिकाणी कामे मंजूर झालेले असून याबाबत माजी आमदार  प्रा. अतुल देशकर यांचे मार्गदर्शनाखाली या कामांची निवड करण्यात आली. या कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम त्यांचेच हस्ते संपन्न होणार होता, परंतु प्रासंगिक कारणांमुळे ते उपस्थीत राहू न शकल्यामुळे या कामांचे भूमिपूजन प्रा.  रामलाल महादेव दोनाडकर, सभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी.सौ. सुनीता ठवकर ,उपसभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी .अॅड.सौ. दीपाली  मेश्राम. जिल्हा परिषद सदस्या चंद्रपुर.सौ. उर्मिला धोटे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी .श्री. प्रकाश नन्नावरे सदस्य पंचायत समिती  ब्रम्हपूरी, सौ. ममता  कुंभारे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी , सौ सुनंदा ढोरे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी यांचे हस्ते करण्यात आले 

यावेळी श्री. रवि मेश्राम माजी सभापती पं. स. ब्रह्मपुरी .श्री अनिल तिजारे सरपंच तलोधी, श्री ज्ञानेश्वर दिवटे,भाजपा युवा नेते तथा ठेकेदार  बल्लारशाह, श्री धीरज पाल भाजपा सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी ,श्री दिवारू कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते 

  मौजा-बोरगाव येथे सौ. उर्मिला धोटे यांनी सुचवलेल्या काम-सौर उर्जेवर आधारित दुहेरी वाटर पंपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ मेघा कवडु पिंपळकर,श्री रुपेश मैंद उपसरपंच बोरगाव. श्री धनु गौतम तोंडरे सदस्य ,सौ वैशाली महेश ठाकरे सदस्या,सौ.अर्चना विजय  दोनाडकर सदस्या.तसेच भाजपा ज्येष्ठ नेते श्री.प्रभाकर भागडकर ,मन्साराम तोंडरे, ईश्वर मैंद, अंबादास दुपारे माधव प्रधान इ.प्रामुख्याने उपस्थित होते 
 मौजा भगवानपुर येथे श्री प्रकाश  नन्नावरे सदस्य पंचायत समिती  ब्रम्हपूरी यांनी सुचवलेली काम- सौर उर्जेवर आधारित दुहेरी वॉटर पंपाचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सौ. मनीषा मडावी सरपंच ,श्री सुधाकर कांबळी उपसरपंच,श्री. राजेश्वर ठाकरे सदस्य ,राजू प्रधान सदस्य, सौ. अर्चना मरस्‍कोल्हेे सदस्या ,प्रल्हाद चौधरी ,ईश्वर नन्नावरे ,नामदेव शेंडे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते 
मौजा - चोरटी येथे श्री.प्रकाश नन्नावरे पंचायत समिती सदस्य ब्रह्मपुरी यांनी सुचवलेली काम हायमास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सरपंच सौ. मनीषा मडावी .उपसरपंच श्री सुधाकर कामडी , राजेश्वर ठाकरे ,राजू प्रधान ,सौ. अर्चना मरस्कोल्हे , प्रल्हाद चौधरी,  दिलीप  राऊत, विश्वनाथ ढोरे,  देविदास प्रधान इत्यादी उपस्थित होते 

       मौजा-वायगाव येथे श्री. प्रकाश भाऊ नन्नावरे यांनी सुचवलेले काम हाय मास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच श्री गुरुदेव तुपट ,,उपसरपंच श्री चक्रधर ढोक ,ग्रा.पं. सदस्य श्री सुधाकर नन्नावरे ,श्री सदानंद शेंडे ,सौ. कौशल्या बुल्ले, सौ. भारती निकोडे. इत्यादी उपस्थित होते,मौजा गांगलवाडी येथे सौ. सुनीता ठवकर उपसभापती पं.स.ब्रम्हपूरी यांनी सुचवलेले काम जिल्हा परिषद शाळेला स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच श्री धनंजय बावणे .ग्रा.पं.सदस्य श्री .विवेक बनकर .सौ.  सुमती खरकाटे सदस्या.सौ हिरकन्या कोसे सदस्या, श्री बरकत अली शेख .हे प्रामुख्याने उपस्थित होते , मौजा- डोरली येथेे प्रा. रामलाल महादेव दोनाडकर सभापती ,पंचायत समिती ,ब्रह्मपुरी यांनी सुचवलेले काम हाय मास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सरपंच सौ. वनश्री शेंडे, उपसरपंच श्री ठाकरे ,ग्रा.पं.सदस्य श्री संजय तलांडे,श्री. जगदीश अलोने.सौ.गीता विलास राऊत सौ.आखाडे ग्रामसेविका श्री. संजय ऊरकूडे रोजगार सेवक, श्री. देविदास राऊत ग्रा.पं. कर्मचारी .श्री सुरेश राऊत, श्री. भाग्यवान ठाकरे श्री केवळराम ठाकरे, श्री. भगवान घुटके श्री. नवनाथ  भेंडारे ,श्री. विश्वनाथ राऊत,श्री.मधुकर दोनाडकर,श्री.सागर लिंगायत, श्री  नामदेव पत्रे, श्री. हरी घुटके श्री. मारुती दोनाडकर श्री .नरेश ठाकरे ,श्री. मनोहर ठाकरे,श्री. रामभाऊ राऊत ,श्री. पप्पू राऊत  श्री. धनराज बुल्ले आणि बहुसंख्य डोरलीवासीय जनता उपस्थित होती.

Previous Post Next Post