बल्लारशाह राष्ट्रवादी काॅग्रेस तर्फे वार्डा - वार्डात सँनिटायजर युक्त फवारणी .
( विदर्भ माझा न्युज 24 ),बल्लारशाह :-
सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्या साठी संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.
त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस बल्लारशाह ने एक पाऊल मदतीचा पुढे टाकत
बल्लारशाह राष्ट्रवादी काॅग्रेसचे गोलु डोहणे यांच्या मार्गदर्शनात बल्लारशाह येथिल संपूर्ण बुद्ध नगर वॉर्ड तसेच संतोषी माता वार्ड मधील काही परिसरामध्ये सॅनिटायझर युक्त फवारणी करण्यात आली.



