Top News

आपनास माहीती आहे का आदिवासी सुपरस्टार आणि जगातल्या एकमेव मोगली बद्दल.

आपनास माहीती आहे का आदिवासी सुपरस्टार आणि जगातल्या एकमेव मोगली बद्दल.


विदेशी चित्रपटाला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली म्हणजे चेंदरू मडावी..



( विदर्भ माझा न्युज 24 )‌बस्तर :-

एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर असलेल्या आदिवासी मित्रांच्या वाल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला कि असं वाटायचं असेल एखाद्या चित्रपटातला म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं. नेमका हा चेंदरू कोण.? याची उत्सुकता मनाला लागुन गेली. गुगल मास्तर च्या वाचनालयात याच चंद्रु विषयी थोडी शोधा शोध केली तेंव्हा समजले अरे हा चेंदरू तर जगातला एकमेव मोगली आहे. भारतातल्या एका आदिवासी गावातला आणि आदिवासी कुटुंबातला लहानसा मुलगा चेंदरू त्याचा एक मित्र वाघ त्या वाघाच नाव  टेंबू .

चेंदरू आणि टेंबू च्या मैत्रीने पूर्ण प्रांतात नाव लौकिक मिळवलाच ह्याच मैत्रीने नंतर जगाची सफर केली. स्वीडन येथील आर्नेस डोर्फ या चित्रपट निर्मात्याने टेंबू आणि चेंदरूच्या मैत्रीवर चित्रपट काढून ऑस्कर पुरस्कार मिळवला. जगाने आर्ने सक डोर्फ यांना जगाने कायम आठवणीत ठेवले. मात्र ज्या चंदरू ने आर्नेस डोर्फ यांना जागतिक ओळख दिली त्या चेंदरूला भारतातच कुणी ओळखत नव्हते. 
चंदरूची आठवण भारतीयांना झाली तेंव्हा मात्र चेंदरू जग सोडून गेला होता. जगातली सर्वात मोठी आणि महान असलेल्या आदिवासी संस्कृतीत चंदरू चा जन्म झाला होता. डोंगर दऱ्या आणि नद्यांनी वेढलेल्या बस्तरच्या जंगलांनी त्याचे पालनपोषण केले. जंगल हि आदिवासींची आई आहे तर त्या जंगलात राहणारे सर्वच प्राणी भाऊबंध मानतात. आपल्या दिवसाची सुरुवात त्यांच्या कडून जंगलाची पूजा करून होते. जंगल आणि आदिवासींच्या या नात्याला ओळख दिली ती बस्तर च्या जंगलातील चेंदरू याने. 
चेंदरू चे वडील आणि आजोबा खूप चांगले शिकारी होते. शिकारी साठी रोज जंगलात जावे लागे, अश्याच एक दिवस  त्यांनी चेंदरू साठी एका मोठ्या टोकरीत वडील आणि आजोबांनी भेट आणली. चेंदरूला टोकरी उघडायला लावली. नक्कीच एखाद्या मोठ्या जनावराचे चवदार मटन असणार या उद्देशाने आनंदाच्या भरात चेंदरूने टोकरी उघडली त्यात त्याला वाघाचं लहानसं गोंडस पिल्लू दिसलं. चेंदरू वाघाचं पिल्लू हातात घेतलं आणि वाघाच्या व माणसाच्या मैत्रीच्या एका अतूट धाग्याची गुंफण तयार झाली. प्राणी आणि मानवाच्या मैत्रीची सुरुवात झाली. चेंदरू चंदरुची बहिण आणि टेंबू एकत्र एकाच पत्रावळीवर जेवण करायचे. वाघाने माणूस मारल्याचे अनेक वेळा वाचले मात्र वाघाने माणसा सोबत बसून माणसाच्या पंगतीतले जेवण खाल्ल्याची जगातली हि पहिलीच घटना असावी. टेंबू मोठा झाला होता त्याच्या खाण्यात वाढ झाली होती. चेंदरू टेंबूसाठी मोठमोठे मासे मारून आणायचा. टेंबू मोठ्या थाटात ते मासे खायचा. 

अश्या या निर्मळ मैत्रीची चर्चा कशी कुणास ठाऊक साता समुद्रापार गेली एक दिवस बस्तरच्या या जगलात चेंदरू च्या घरासमोर गोऱ्या लोकांच्या गाडयांचा ताफा येऊन थांबला. मोठ मोठ्या मशीन, कॅमेरा. घेऊन आलेल्या. लोकांनी चेंदरू ला घेऊन चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. चित्रपटाचे नाव होते दि जंगल सागा बस्तरच्या जंगलातील आदिवासींना घेऊन चित्रित केलेल्या या चित्रपटाने जगभरात धुमधडाका करून टाकला होता. जगभरात चेंदरू हिरो झाला होता. त्याला बघायला लोक उतावळे झाले होते. भारतात मात्र या गोष्टीची भनक देखील नव्हती. चित्रपटात २ रुपये रोजाने काम करणारा चेंदरू सुपरस्टार झाला होता. बस्तरच्या जंगलातील माडिया गोंड या आदिवासी जमातीचा हिरो चेंदरू मडावी. 
जगभर लोकांनी या फिल्म ला डोक्यावर घेतले होते आता लोकांना या फिल्म मधील हिरो ला भेटायचे होते, जवळून अनुभवायचे होते. लोकांच्या आग्रहा खातर आर्नेस डोर्फ यांनी चेंदरूला स्वीडनला नेले स्वीडनला तिथे काळा हिरो म्हणून संबोधले गेले. चेंदरू एक वर्षभर आर्नेस डोर्फ यांच्या घरी राहिला. वर्षभर स्वीडन च्या लोकांनी चेंदरू ला पाहिले आणि चंदरू ने स्वीडनचे दर्शन केले. फिल्म आणि दिग्दर्शक चेंदरू च्या छायेत श्रीमंत झाले होते मात्र चेंदरू तसाच रिकाम्या हाताने:मायभूमीत परत आला. फिल्म च्या लोकप्रीयतेचा एक टेंबू काही दिवसातच जग सोडून गेला. चेंदरूने बस्तर च्या आदिवासी परंपरेनुसार आयुष्याच्या मार्गावरचा जोडीदार गोटुल मध्ये निवडून लग्न केले. स्वप्नाच्या दुनियेतून चेंदरू बाहेर आला होता आता त्याला पोटाची खळगी भरायला धडपड करावी लागत होती संघर्ष करावा लागत होता.
चेंदरू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कच्च्या कुडाच्या घरात राहिला. जगात हिरो ठरलेल्या चेंदरूची दि जंगल सागा हि फिल्म ४० वर्षांनंतर बस्तरच्या आदिवासींनी पाहिली. चेंदरूच्या बायकोला अजूनही वाटत नाही कि आपला नवरा कधी सुपरस्टार होता. ४० वर्षानंतर गावातील व परिसरातील लोकांनी फिल्म पहिली मात्र चेंदरू ती फिल्म पाहू शकला नाही कारण त्यावेळी चेंदरू जुना आठवणीत गरीबीचे ओझे पाठीवर घेऊन अंधारात रडत बसला होता. माणसाच्या आणि प्राण्याच्या मैत्रीचा आदर्श नमुना ठरलेला आणि चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहचलेल्या चेंदरूला आजारपणात उपचारासाठी न्यायला देखील पैसे राहिले नाहीत शेवटी १८ सप्टेंबर २०१३ ला या आदिवासी सुपरस्टार आणि जगातल्या एकमेव मोगलीने जगाचा निरोप घेतला. 
कुणी आपला शेवटचा श्वास घेतला तर त्याच्या साठी श्रद्धांजली वाहणाऱ्या लोकांची स्पर्धा लागते मात्र ६० वर्षे अगोदर वाघाच्या आणि माणसाच्या मैत्रीचा संदेश जगाला देणाऱ्या चेंदरू बद्दल कुणी साधा एक शब्दही काढला नाहीकि कुणाला सार्वजनिक श्रद्धांजली वाह्ण्याचीहि गरज वाटली नाही.

प्रदिद्धी मिळवून देखील दारिद्र्याने त्याची पाठ सोडली:नाही. करोडो डॉलर आणि शेकडो पुरस्कार मिळवणाऱ्या फिल्म चा हिरो शेवटी उपवाशीपोटी जग सोडून गेला.....

Previous Post Next Post