Top News

भाजपा स्थापना दिना निमित्त बल्लारशाह भाजपा कार्यालयात सत्कार कार्यक्रम संपन्न.

 भाजपा स्थापना दिना निमित्त बल्लारशाह भाजपा कार्यालयात सत्कार कार्यक्रम संपन्न.




(विदर्भ माझा न्युज 24)बल्लारशाह :- आज दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी विकास पुरुष आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजपा कामगार आघाडी व भारतीय जनता युवा मोर्चा च्या माध्यमातून बल्लारशाह शहरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले ज्या मध्ये माजी सैनिकांचा, कोरोणा योध्यांचा व सेल्फी विथ फ्लॅग या उपक्रमाव्दारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपा कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले. यावेळी कार्यक्रमची अध्यक्षता माजी न.प.उपाध्यक्ष गोपाल रेड्डी यांनी केली सोबत नगर परिषद उपाध्यक्षा मीना चौधरी, वरिष्ठ नगरसेवक गणेश बहुरिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रतीक बारसागडे यांनी केले.

या कार्यक्रमात माजी एयरफोर्स अधिकारी एवं बीकानेर स्वीटमार्ट चे संचालक प्रतापजी राजपुरोहित व माजी सूबेदार मेजर कलीराम फोगाट यांचे तसेच कोरोना योद्धा व सामाजिक कार्यासाठी गुलशन शर्मा, रमेश शुक्ला, श्रीकांत उपाध्याय, आर्यन शर्मा, मोहित डंगोरे, प्रकाश दोतपेल्ली, आबिद शेख, श्रीकांत आंबेकर, नफीस अंसारी, अरुण भटारकर, शिबू शर्मा,संजय वाजपेई तसेच सेल्फी विथ फ्लॅग उपक्रमात मनीष रामिला, स्वामी रायबरम, शुभम बहुरिया, राजेश कैथवास, हरी लंका या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गणेश चौधरी, सोमेश खंडेलवाल, कैलाश गुप्ता, मिथलेश पांडे, अब्दुल करीम शेख ,शीवभोला सिंग, सुधाकर पारधी, रिंकू गुप्ता, मौला निषाद, संजय प्रसाद,रोहन तोकल तसेच अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Previous Post Next Post