मृतक विशाल हंसकर यांच्या कुटुंबाला मदत जाहीर...
कुटुंबातील एका व्यक्तीला नौकरी व आर्थिक मदत लेखी स्वरूपात आश्वासन ...
जी आर एन कंपनी मध्ये नोकरी आणि एकूण 32 लाख 50 हजार रोख रक्कम मदत लेखी अश्वासनामध्ये...
(विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतीनीधी)मनोज श्रीहयी गोरे,राजुरा :- काल दुपारी 4 वाजता वरोडा येथील विशाल हंसकर यांचे साखरी पोवनी 2 खुली खदान मधील संप मध्ये बुडुन मृत्यू झाला.मृतक विशाल हंसकर खाजगी ठेकेदारकडे काम करीत होता.अचानक विशाल च्या मृत्यू ची बातमी गावात माहीत होताच साखरी,वरोडा हिरापुर येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठला.विशाल च्या कुटुंबाला आर्थिक मदत आणी नोकरी जाहीर करत नाही तो पर्यंत मृतक विशालचे मृतदेह हलवू दिले नाही.
नागरिक संतप्त झाले प्रशासनाला वेठीस धरले जो पर्यंत मदत जाहीर करणार नाही तो पर्यंत शव वाहिक हलवू देणार नाही.संतप्त कामगार आणि नागरिक याची भूमिका लक्षात घेत अखेर पोवनी 2 उपक्षत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक एकंबरम यांनी मृताच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी 1 लाख रुपये देण्याचे जाहीर केले.तसेच मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला जी आर एन कंपनी मध्ये नोकरी आणि 4 तारखेला 12 वाजेच्या आत 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि एक्स ग्रेसिया 15 लाख रोख रक्कम,शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर वर्कमन कंपणसेशन आक्ट नुसार16 लाख 3 दिवसाच्या आत देण्याचे लेखी आश्वासन दिले.कामगार आणि नागरिक यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
त्यावेळी उपस्थित बबन उरकुडे ,सचिन गोरे,खुशाब पोडे,अमोल घटे ,आणि संदीप वैरागडे यांनी लेखी आश्वासन साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

