२०२०-२०२१ या सत्रातील ५०% शैक्षणिक शुल्क कमी करा :- राजू झोडे
वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर द्वारा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह :- कोरोना महासंकट काळात २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील शाळा संपुर्णरित्या बंद होत्या. यादरम्यान विद्यार्थ्यांना घरीच ऑनलाइन शिक्षण शाळामार्फत देण्यात येत होते. लाकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेचे हातचे काम गमवावे लागले त्यामुळे जनतेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.तसेच शाळा बंद असल्याने कॉन्व्हेंट व खाजगी शाळांच्या व्यवस्थापन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.तरीसुद्धा कॉन्व्हेंट व खाजगी शाळा मार्फत पालकांना जबरदस्तीने संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरा अन्यथा परीक्षांना बसू देणार नाही अशी बऱ्याच शाळांमधील पालकांची तक्रार आहे.प्रशासकीय स्तरावरून जबरदस्तीने शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये असे शाळांना कळवले असताना कॉन्व्हेंटमध्ये व खाजगी शाळांमध्ये संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून पालक अस्वस्थ झालेले आहेत.करिता या शैक्षणिक क्षेत्रातील शैक्षणिक शुल्क ५०% माफ करण्यात यावे करिता वंचित बहुजन आघाडी द्वारा राजु झोडे यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर द्वारा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू झोडे यांनी संबंधित शासन व प्रशासनाला दिला. मागणी करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, संपत भाऊ कोरडे, सचिन पावडे, वंदनाताई तामगाडगे, भास्कर वडस्कर, ओम रायपुरे, विकास कोवे, अनिरुप पाटील, शिवकुमार शेट्टी, जॉकिर खान ,लक्ष्मण निषाद नविन डेविड सुभाष गोंडाणे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
