Top News

बल्लारशाह येथे रेल्वे अपघातात अस्वलीचा मृत्यु.

 बल्लारशाह येथे रेल्वे अपघातात अस्वलीचा मृत्यु.      


बल्लारशाह चे वनपरीक्षेत्र अधीकारी संतोश थीपे करीत आहे तपास.



(विदर्भ माजा न्युज 24)बल्लारशाह  :-  १२/३/२०२१ रोजी पहाटे १.०० वाजता च्या दरम्यान अस्वल वन्यप्राणी (नर) रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.सदर घटना बल्लारशाह वनपरीक्षेत्रातील विसापुर नियत क्षेत्राअंतर्गत विसापुर ते बल्लारशाह रेल्वे रुट वरील‌ कीलोमिटर पोल क्रमांक ८८६/२७ ते ८८६/२९ च्या दरम्यान घडली घटनेची माहीती ऐहसान उल्हा खान यांनी दीली असता तातडीने प्रकरणाच्या चौकशी साठी वनपीरीक्षेत्र अधीकारी संतोष थीपे,क्षेत्र साहाय्यक एन.आर.भोवरे,नियतवनरक्षक डी.बी.टेकाम व विसापुर वनरक्षक ए.पी. तीजारे यांनी मौका स्थळी हजर होऊन‌ घटनेची पाहनी केली, 

बल्लारशाह चे डिप्टी स्टेशन प्रभंधक ऐहमद खान यांना माहीती देऊन‌ पशु वैद्यकीय अधीकारी डाॅ.कुंदन पोडचलवार यांचे पाचारण करण्यात आले, पशु वैद्यकीय अधीकारी यांनी असवलाच्या शवाची पहानी करून रोप वाटीका विसापुर इथे शव‌ विच्छेदन करुन शवाश दहन करण्यात आले,

सदर प्रकरणात आकस्मीत मृत्यु बाबद नियत क्षेत्र विसापुर अंतर्गत प्राथमीक गुन्हा क्रमांक १०/२३ दि.१७/३/२०२१ नुसार नोंवीण्यात आला असून प्रकरनाचा पुढील अधीक तपास मध्य चांदा वन विभाग चांदा चे उपवनसंरक्षक अरवींद मुंढे यांचे मार्गदर्शना‌‌ खाली बल्लारशाह चे वनपरीक्षेत्र अधीकारी संतोश थीपे करीत आहे.

Previous Post Next Post