Top News

बल्लारशाह पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला.

 बल्लारशाह पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला.


पिस्तुल,२ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी अटकेत.



(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे, बल्लारशाह:- गुरुवार रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शहरातील हद्दपार केल्या गेलेला(तडीपार)येदुराज रामनरेश आरक(बच्ची) रा, सुभाष वॉर्ड हा तडीपार आरोपी कमरेला पिस्तूल (देशी कट्टा) घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. 

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील आपल्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन वस्ती विभाग सर्च आॅपरेशन करून मोठया शिफातीने रात्री एक वाजता च्या सुमारास बच्ची उर्फ येदुराज (29)व साथीदार फारुख ऐय्याश शेख रा, बालाजी वॉर्ड दोघांना मोटार सायकल वर फिरत असतांना ताब्यात घेतले व झडती घेतली त्यांचा कडून कमरेला खोसलेली पिस्तूल (देशी कट्टा) व साथीदार फारुख याचा खिशात दोन जिवंत काडतुसे मिळाली दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असुन. दोघांवरही कलम 425 भारतीय हत्यार कायदा व 142 महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला.ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णें,पोलीस उपनिरीक्षक चांदोरे, ना, पो, शी, सतीश पाटील, शरद कुडे,सीमा कोरते, विशिष्ट रंगारी यांनी केली.

Previous Post Next Post