Top News

दिलेले आश्वासन पाळले नाही तर वेकोलि प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा राजु झोडे यांचा इशारा

 दिलेले आश्वासन पाळले नाही तर वेकोलि प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा राजु झोडे यांचा इशारा


वेकोलि ने शेतकऱ्यांचा रस्ता जाण्या-येण्याकरिता मोकळा करावा:- राजु झोडे



   (वादर्भ माझा न्युज 24)बल्लारशाह :-  वेकोलि लगत WCL परिसरात वर्धा नदीच्या काठालगत अनेक शेतकर्‍यांच्या शेती आहेत. सदर शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्याकरिता जुना रस्ता होता त्या रस्त्यावर वेकोलि ने मोठे मोठे मातीचे ढिगारे टाकून शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा संपूर्ण रस्ताच बंद केला. मातीच्या ढिगार्‍यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाडे असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाही. मागील कित्येक वर्षापासून या अडचणींचा सामना शेतकरी करत असून शेतात जाता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याबाबत शेतकऱ्यांनी वेकोली प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती. परंतु वेकोली प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित ठेवत आहे. शेतकरी शेतात जाण्याकरिता रस्त्याचा वापर केला तर WCL चे कर्मचारी दमदाटी देतात. ही बाब अतिशय गंभीर असून वेकोलि प्रशासनाने या कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन सदर शेतकऱ्यांचा शेतीत जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा करिता उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात पिडीत शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. वरील मागणी तात्काळ पूर्ण करावी अन्यथा शेतकऱ्यांसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार संबंधित प्रशासन राहणार असा इशारा राजु झोडे यांनी प्रशासनाला दिला.

        निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, प्रशांत साळवे विकी गुप्ता, लक्ष्मण पिसुळे, सातपुते काका, दिवाकर उंबरे, देवराव पिसुळे, अनिल पिसुळे, वसंत उमरे आदी शेतकरी उपस्थित होते.

      


Previous Post Next Post