Top News

हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा ९१ किलो गांजा जप्त.

 हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा ९१ किलो गांजा जप्त.


गांजा तस्कर निघाला चक्क हैदराबादचा शिक्षक.


 नागपूर पोलिसांची मोढी  कारवाई.



(विदर्भ माझा न्युज 24),नागपूर :- नागपूरच्या बेलत रोडी पोलिस स्टेशन अंतर्गत हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा ९१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. यात  धक्कादायक म्हणजे  गांजा तस्करी करणारा चक्क एक शिक्षक निघाला असून पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव असुन. 



लॉकडाऊनमुळे हैदराबादमध्ये त्याची शाळा बंद झाल्याने त्याने गांजा तस्करी सुरू केल्याचं पोलिसांना सांगितले आहे. तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. 


नागपूर पोलिसांना  हैद्राबादहून नागपूरमार्गे दिल्लीला गांजाची मोठी खेप जात असल्याची गुप्त माहिती सुत्रांनकडुन मिळाली होती. त्या नुसार पोलिसानी आपली सुत्र हलव त्वरीत वर्धा मार्गावर सापळा रचून DL-4c-AD-3665 या क्रमांकाच्या गाडीला थांबवून झडती घेतली. 


या गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपये किंमतीचा 91 किलोचा गांजा जप्त केला आहे.


आता या प्रकरणाचा नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या मागे काही रॅकेट आहे, का या चाही तपास नागपुर पोलीसांन कडुण करण्यात येतोय.

Previous Post Next Post