संजय गांधी निराधार योजने च्या कोर कमिटी चा धडाकेबाज निर्णय. बैठकीत 140 पैकी 129 प्रकरण मंजूर.
(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतीनीधी) संदीप तेलंग, मुल :- आज मुल येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची बैठक अध्यक्ष श्री राकेश रत्नावार यांच्या नेतृत्वावर पार पडली. या बैठकीमध्ये 140 प्रकरणे मंजूर साठी आलेले होते. त्यापैकी 129 प्रकरण मंजूर करण्यात आलेले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 30 यापैकी 25 पात्र व अपात्र ठरविण्यात आले. तसेच श्रावण बाळ योजनेमध्ये 110 यापैकी 104 पात्र व 6 अपात्र ठरविण्यात आले. या बैठकीला मा. तहसीलदार पवार साहेब, बीडीओ खडसे साहेब पंचायत समिती,अशासकीय सदस्य श्री नितीन येरोजवार, दशरथ वाकुडकर, सत्यनारायण अमरूदिवार, रूपाली संतोष पवार, अर्चना चावरे व इतर सदस्य हजर होते.
