राष्ट्रवादी काँग्रेस मुल तर्फे वाढत्या महागाई विरोधात निषेध आंदोलन .
(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतीनीधी) संदीप तेलंग,मुल :- राज्यामध्ये वाढलेले पेट्रोल डिझेलचे दर , महागाई, बेरोजगारी, जी डी पी ची घसरण याविरोधात मुल शहरांमध्ये मुल शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तसेच युवा नेतृत्व सुमित भाऊ समर्थ यांच्या नेतृत्वात मूल शहरामध्ये विविध ठिकाणी केंद्र सरकार विरोधात विविध ठिकाणी बॅनर होल्डिंग लावून निषेध आंदोलन व मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलना मध्ये किसन वासाडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष अर्चना चावरे,भास्कर खोब्रागडे, प्रशांत भरतकर व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
