बेरोजगार तरुणांनो राष्ट्रसंताच्या ग्रामगीता चे आत्मचिंतन करा आता तुम्हाला ग्राम स्वराज्य निर्माण करायचे आहे - मधुसुदन कोवे
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,यवतमाळ :- जागतीकीकरण आणि खाजगीकरण या सरकार च्या राष्ट्रीय धोरणावर सामाजिक संघटना आता प्रश्न चिन्ह उभे करत आहे.सरकार बेरोजगार तरुणांना सरकारी नौकरी पासुन वंचित करत आहे खाजगीकरण करुण तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी सरकार बेरोजगार तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे.
या देशात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या थोर पुरुषानी ज्या राष्ट्रसंतानी या देशाच्या तरुणांनी जे कार्य केले त्यांच्या संपूर्ण कार्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे या देशात पक्ष पध्दती स्विकारुन खाजगी मक्तेदारी चे बाजारीकरण करत आहे आणि बेरोजगार तरुणांना वेठीस धरण्याचं काम या देशाचे सरकार करत आहे. या साठी राष्ट्रसंतानी निर्माण केलेली ग्राम गीता ही आत्मसात करण्यासाठी तरुणांनी समोर येनं आवश्यक आहे.
जाग उठो तरुणांनो अब तुम्हारी बारी हैं ।।
ग्राम स्वराज्य निर्माण करणा ये तुम्हारी जिम्मेदारी हैं ।।
या देशात आत्मनिर्भर होण्यासाठी राष्ट्रसंतानी लिहुण ठेवलेली ग्राम गीता बेरोजगार युवकांना अतिशय उपयुक्त आहे शेतक-यासाठी स्वावलंबी आहे महिला साठी ग्रामन्नोती आहे या साठी आपन ग्राम स्वराज्य निर्माण करण्यासाठी ग्राम पातळीवर आंदोलन उभे करण्यासाठी गावातील तरुणांनी सहभागी होणे महत्वाचे आहे
ग्राम स्वराज्य महामंच चे संस्थापक अध्यक्ष यांनी कळंब येथे जावुन मा.प्रशांत कुमार सोयाम यांची सेवा निवृत्ती झाली त्यांच्या पुढील आयुष्यात स्वाभिमान कायम रहावं या साठी भेट घेवुन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मा.हेमतजी ठाकुर (मध्यप्रदेश) बिपीनलाल वाढीवा(मध्यप्रदेश)देवा मडावी शेख रुस्तम शेख (पत्रकार)आणि ग्राम स्वराज्य महामंच चे संस्थापक अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे उपस्थित होते.
