जय विदर्भचा नारा कानावर पळताच लाईनमॅन पळाले.
आज लॉकडाऊन मध्ये बेशरम सरकारने वीज कनेक्शन कसे कापले? - विराआंस.
बंगाली पंजा नागपूर मध्ये महावितरणने कनेक्शन कापले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने ते जोडले.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,राजधानी नागपुर :- आज दि. 27 फेब्रुवारीला शासनाने नागपूरला लॉकडाऊन जाहीर केल्यावर संपूर्ण शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद असल्यावर सर्वच जनतेला घरी बसा, घराबाहेर निघू नका असा शासनाचाच आदेश असल्यावर सुद्धा बेशरम महाराष्ट्र सरकारने विजग्राहकांचे वीज कनेक्शन धडाधड कापा असे आदेश दिलेच कसे? व वीज महावितरण कंपनीने लाईनमॅन पाठवून नागपूर शहरातील बंगाली पंजा, लाल दरवाजा या भागातील विजग्राहकांमध्ये दहशत निर्माण करून धडाधड वीज कनेक्शन कापले कसे? याचे उत्तर हे विजग्राहकांच्या जिवावर उठलेले सरकार व वीज महावितरण कंपनीला द्यावे लागेल असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.
मध्य नागपूर शहरातील बंगाली पंजा (लाल दरवाजा) भागातून हॅन्डीकॅप असलेले इम्रान अली या विजग्राहकाने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नागपूर विभाग युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर तसेच मध्य नागपूर व्यापारी आघाडी अध्यक्ष रविंद्र भामोडे यांना फोन करून सांगितले की आमच्या येथे वीज लाईनमन वीज कनेक्शन कापण्यास आले आहे तुम्ही या. लगेच मुकेश मासुरकर, रविंद्र भामोडे, प्रशांत जयकुमार हे तिन्ही प्रमुख निघाले व बंगाली पंजा येथे पोहचताच त्यांनी जय विदर्भ असा नारा दिला तेव्हा पर्यंत वीज लाईनमॅनने रहिमाबी शौकत अली, रूक्साना बेगम अजीज खान, तुकेल मिस्त्री, सलीमभाई अलमारीवाले यांचे वीज कनेक्शन कापले होते. पाचवी लाईन कापताना “जय विदर्भ” हा नारा ऐकल्या बरोबर व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते तेथे पोहचल्या बरोबर वीज कापणार्या 7-8 लाईनमॅनने तेथून पळ काढला. हे सर्व विजग्राहक गरीब परिस्थितीतले होते.
समितीचे प्रमुख कार्यकर्ते मुकेश मासुरकर, रविंद्र भामोडे व प्रशांत जयकुमार यांनी क्षणाचाही विचार न करता तुमचे कनेक्शन जोडून द्यावे काय विचारले असता त्यांनी होकार देताच या चारही विजग्राहकांचे कनेक्शन जोडून देण्यात आले. त्यांच्या घरी पुन्हा प्रकाश आला, त्यांच्या चेहर्यावर आनंद झळकू लागला.
वीज कापायच्या अगोदर नोटीस द्यावे लागते नंतर 15 दिवसांनी लाईन तोडण्याचा नियम असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवून, नोटीस न देताच, कोणतीही पूर्वसूचना न देता लॉकडाऊन असतानाही त्यांचे कनेक्शन कापले कसे? या चारही विजग्राहकांवर लॉकडाऊन व अगोदर मिळून लाखाच्यावर बिले आली आहेत. म्हणून त्यांनी वीज बिले भरली नाही व ते भरूही शकत नाही.
इम्रान अली हॅन्डीकॅप यांचेवर लॉकडाऊन मधील 76 हजार व अगोदरचे मिळून 1 लाखावर वीज बिल थकीत आहे. त्यांचीही लाईन कापणार होते परंतु त्यांनी नोटीस देऊन 15 दिवस झाले नाही मग तुम्ही लाईन कशी कापता अशी हुज्जत घातली म्हणून यांची लाईन कापली नाही कारण इम्रान अली हे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संपर्कात होता.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की कोरोना काळातील वीज बिल महाराष्ट्र सरकारने भरावे, 200 युनिटपर्यंत वीज फ्री करा, त्यानंतरचे वीज बिल निम्मे करा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करा यासाठी वीज बिल भरू नका, वीज कनेक्शन कापू देऊ नका त्याचा सामुहीक प्रतिकार करा, लाईन कापली तर जोडून घ्या, किंवा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते जोडून देतील. या आंदोलनात सामील व्हा. “सरकार वीज कनेक्शन कापणार तर विदर्भ राज्य आंदोलन समिती जोडून देणार” आम्ही विजग्राहकांच्या बाजूने उभे आहोत हिम्मत ठेवा व तुमच्या आमदार, खासदारांना प्रश्न विचारा तुम्ही आमचे प्रतिनिधी आहेत की सरकारचे? असे आवाहन विदर्भ आंदोलनाचे नेते राम नेवले यांनी केले आहे.
आजच्या या “वीज कनेक्शन जोडो” आंदोलनात नागपूर विभाग युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, व्यापारी आघाडी मध्य नागपूर अध्यक्ष रविंद्र भामोडे, जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष प्रशांत जयकुमार या नेत्यांनी वीज कनेक्शन जोडून दिल्यामुळे त्या परिसरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या घोषणांनी परिसर दुमदमून गेला होता. या आंदोलनात जाफर खान, रमीज खान, इम्रान अली, सैय्यद इमरान, तारीक अन्वर वशीम शेच, शारूख शेख, इम्रान खान, फैजान खान, शेख नवाज, शोफी शेख, अब्दूल हबीब, सैय्यद पाशु अली, दानीश शेख, आशीष भोतमांगे, सारीक शेख, शुभम भोतमांगे आदीसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

