Top News

रस्ते सहित अनेक समस्यांचे होणार निवारण.

 रस्ते सहित अनेक समस्यांचे होणार निवारण.


शासन आपल्या गावी उपक्रमम वाई बाजार येथे संपन्न. 



 (विदर्भ माझा न्युज 24 - प्रतीनीधी)माहुर :- ग्राम पातळीवर नागरिकांची खोळंबलेली प्रशासकीय कामे मंडळस्तरावरच मार्गी लावण्यात यावी व तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी व्हावी याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाअंतर्गत शासन आपल्या गावी कार्यक्रमाचा उपक्रम (ता.२६) रोजी वाई बाजार येथील गो माता मंदिर परिसरात पार पडला.

प्रशासन आपल्या गावी कार्यक्रमादरम्यान विविध विभागामार्फत विविध योजना व नागरिकांची सनद यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.शिवाय नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मंडळस्तरावर सोडविण्यात आले.मागील महिन्यात ह्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात माहूर तालुक्यात करण्यात आली.  यावेळी महसूल विभाग,पंचायत समिती,आरोग्यविभाग,भूमिअभिलेख,तालुका, कृषी अधिकारी,महिला व बालविकास,सहायक निबंधक संस्था,पशुधन विकास,पोलीस प्रशासन,वन विभाग आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी आपल्या विभागाच्या योजनांसह उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या समस्यांसाठी निवेदन दिलेे.काही निवेदनांचा निपटारा तात्काळ करण्यात आलातर बहुचर्चित वाईट बाजारला गावठाण क्षेत्रात वाढ झाल्याने फेर सिटीसर्वे अभावी प्लॉट खरेदी-विक्री देवाला अडचणी येत असल्याने सिटी सर्वे करण्यात यावे तसेच वाई बाजार येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पाच पाणंद रस्ते मजबूत करण्याची मागणी करण्यात आलीत्यावर तहसीलदार यांनी तात्काळ प्रभावाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन वाई बाजार च्या संदर्भाने दोन्ही प्रश्न लवकरच निकाली काढणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.प्रशासनाच्या या उपक्रमा साठी तहसीलदार राकेश गिड्डे, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे,महिला व बालविकास अधिकारी विशालसिंह चौहान, विस्तार अधिकारी मारोती चिटकुलवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष दांडेगावकर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, सहाय्यक निबंधक श्री.शिंदे,वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रिनिवास हुलसुरे,वनरक्षक एस.के.टिळेवाड,मंडळ अधिकारी टि.जी.सुगावे,कृषी सहाय्यक अटाम थोरे,स्वच्छता विभागाचे गोवंदे,पुरवठा विभागाचे पवन बेहेरे,तलाठी व्हि.पी.राजूरवार,वर्षा ढाळके व मेश्राम,पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत मडावी, दारासिंग चव्हान पत्रकार साजीद खान,कैलाश बेहेरे,प्रा.प्रवीण बिरादार,बाबाराव कंधारे,रुपेश मोरे व शेख जावेद आदींची उपस्थिती होती.सरपंच विमलताई मडावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्‍या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाइ बाजार चे तलाठी विश्वास फड,पोलीस पाटील आशाताई बळीराम मोरे व कोतवाल फुलाजी पंधरे यांनी परिश्रम घेतले.शासनस्तरावर राबविण्यात आलेल्या या लोकोपयोगी कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभाग,महावितरण,पोस्ट,अदिवासी विकास प्रकल्प,बँक,राज्य उत्पादन शुल्क,शिक्षण,दुय्यम निबंधक नोंदणी व सामाजिक वनीकरण अशा दैनंदिनी कामकाजाच्या शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह वाई बाजार च्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती.

Previous Post Next Post