बल्लारशाह सास्ती वेकोलीच्या ओपन कास्ट मध्ये सकाळी आपल्या कार्यावर गेलेल्या वेकोली कर्मचार्याची मृत्यू.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :- बल्लारशाह सास्ती वेकोलीच्या ओपन कास्ट मध्ये सकाळी आपल्या कार्यावर गेलेल्या वेकोली कर्मचारी अक्षय खरतड रा.बल्लारपूर यांचा सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास अपघात घडला, या अपघातात त्यांचा उपचार करताना मृत्यू झाला. सूत्राच्या माहितीनुसार डम्पर पलटल्यामुळे सदर अपघात घडल्याची माहिती असून या अपघातामुळे वेकोली प्रबंधन मात्र सदर अपघाताच्या घटनेला सारवासारव करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.


