इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे सह पाच जणांचे अन्नत्याग सत्याग्रहास साखळी उपोषण
( विदर्भ माझा न्यूज 24 उपसंपादक गोतम कांबळे ) चंद्रपूर (चांदा ) इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी मागील दोन-तीन दिवसापासून रामाळा तलावातील प्रदूषण व प्रदूषित पाणी दूर करण्यासाठी चंद्रपूर येथे अन्नत्याग सत्याग्रहाला सुरुवात केलेली आहे.
या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी इको प्रो चे सदस्य व शहरातील नागरिक उपोषणाला पाठिंबा दिला आहे. इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या मागण्या संदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी उपोषणाला भेट देऊन त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली.
या साखळी उपोषणाला जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, शहरातील विविध संस्था तसेच इतर संघटनांच्या अधिकाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे.
सुरू झालेल्या साखळी उपोषणात बंडू धोत्रे यांच्यासह सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, अनील आडगुरवार, धर्मेंद्र लूनावत , हरीश मेश्राम, प्रतीक मुरकुटे उपोषणाला बसलेले आहे.
