आरोपींचा मनसुबा बल्लारशाह पोलीसांनी लावला उधळुण.
बल्लारशाह पोलीसांची मोढी कारवाही.
गुन्हा घडण्या आधीच आरोपींना अटक.

(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह जि.चांदा :- विदर्भातील बल्लारशाह शहराला मिनी इंडिया, सेकंन्ड बाॅम्बे म्हणून ओळखले जाते त्या मुळे बल्लारशाह शहरात भारतातील अनेक राज्यातील बांधव रोजगाराच्या शोधासाठी येऊन स्थायिक झाले विशेष बाब म्हणजे बल्लारशाह शहरातील वेकोली खाणी मुळे अवैध कोळसा वाहतुकीतून गुन्हेगारी फोफावतांना दिसत आहे. मात्र बल्लारशाह पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात एक मोठा गुन्हा होण्यापासून टळला आहे सूत्रांन कळुन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बल्लारशाह शहरातील भगतसिंग वॉर्ड येथील राधाकृष्ण मंदिर समोरील परिसरात सायंकाळी 5:00 वाजताच्या सुमारास 2 इसम दुचाकी मध्ये एक तलवार लपवून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कोणतीही वेळ न दवळता सदर ठिकाणची कसुन तपासणी केली असता या ठिकाणा वरून एक तलवार व दुचाकी अंदाजे किंमत 70500/-रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला सोबतच 2 आरोपींना अटक करण्यात आली सदर प्रकरणी दोन्ही आरोपी रा.बल्लारशाह यांना अटक करण्यात आली आसुन आर्म ऍक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई बल्लारशाह पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल चांदोरे सहायक पोलिस निरीक्षक व गणेश पुरडकर पोलीस शिपाई बल्लारशाह यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे मात्र पोलिसांच्या या कारवाई मुळे शहरात एक मोठा गुन्हा होण्याचे टळले आहे.