एक हाथ मदतीचा - युवासेना, जिल्हा -चांदा(चंद्रपूर)
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,चांदा :- दिव्यांग विकलांग संस्था मधील आपल्या माता-भगिनी स्वतः च्या कौशल्याने ,कलागुनाने कौशल्याच्या बळावर विविध कागदाच्या वस्तू बनवून त्या विकुन आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याच्या गरजा पूर्ण करून स्वाभिमानाने जगून आनंद घेत असतात,अश्या स्वाभिमानी महिला, युवतींना एक फुल नाही फुलाची पाखळी मदत म्हणून आपल्याकडे असलेल्या रद्दी (जुने व्रुत्तपत्र ) दान स्वरूपात युवा सेना चांदा(चंद्रपुर) पर्यंत पोहचवावी आम्ही आपली मदत विकलांग संस्था मधील आपल्या माता-भगिनी पर्यंत पोहचवू असे आव्हान जनतेला युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांनी केले आहे.
(नोट:- कुणाला जुने रद्दी विकायची असल्यास युवा सेना जिल्हा चांदा(चंद्रपुर) ती विकत सुद्धा घेईल संपर्क करावे. संपर्क करा - 95034 48802)
