Top News

पिंपळगाव (वखाजी) येथील तरुण शेतकर्याची कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या.

 पिंपळगाव (वखाजी) येथील तरुण शेतकर्याची कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या. 



(विदर्भ मज़ा न्यूज़ 24 - उपसंपादक )गौतम कांबळे,नरखेड :- कर्जबाजारी होऊन एका तरुण शेतकर्याने स्वताच्याच शेतात विषारी किटकनाशक पिउन आत्महत्या केल्याची घटना पुलिस स्टेशन नरखेड हद्दीतील पिंपळगाव (वखाजी) शिवारात  दी. २४/१२/२०२० रोज गुरुवार ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकरी तरुनाचे नाव अजय भाऊराव ठाकरे वय वर्ष ४० राहणार पिंपळगाव (वखाजी) असे असून ते  गेल्या २ दिवसा  पासून बेपत्ता होते, दी.२४/१२/२०२० ;ला सकाळी 7 च्या सुमारास शेजारच्या शेतकर्याला अजय भाऊराव ठाकरे यांचा  मृतदेह शेतात पडून आसल्याचे आधळुन आले. गावकरी आणि नातेवाहिकांनि सांगितल्या प्रमाने मृतक शेतकरी कर्जापाई कंटाळलेला होता त्याच्या वर 5 लाखाचे बँकेचे कर्ज होते याच वैतागात त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे . अजय भाऊराव ठाकरेच्या मागे आई पत्नी तसेच २ मूल आसा व्याप्त परिवार आहे.

  प्रथम दर्शनी ही आत्महत्त्याच आसल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच मृतका पासून विषारी किटकनाशकाचा डब्बा तसेच मोबाइल आधळुन आल्याची माहिती पोलिसांनि  दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय नरखेड येथे शव विचेदनासाठी पाठविला असून पुढील तपास नरखेड पुलिस करीत आहेत .

Previous Post Next Post