₹999 मध्ये ओलाने दिला घरगुती वीजेचा ‘रामबाण… हे नेमकं आहे तरी काय?
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांनंतर आता घरगुती ऊर्जा क्षेत्रातही Ola Electric ने मोठी उडी घेतली आहे. कंपनीने केवळ ₹999 मध्ये बुक करता येणारे, रोजच्या वापरासाठी उपयुक्त असे नवे ऊर्जा उत्पादन ‘OLA Shakti’ बाजारात सादर केले आहे. या घोषणेमुळे पारंपरिक इन्व्हर्टर आणि जनरेटर उद्योगात खळबळ उडाली आहे.
OLA Shakti हे एक आधुनिक बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) असून, वीज खंडित झाल्यास घरातील अत्यावश्यक उपकरणांना तत्काळ वीजपुरवठा करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. एसी, फ्रिज, पंखे, दिवे, टीव्ही, पाणी पंप अशा उपकरणांसाठी याचा उपयोग करता येणार आहे.
Ola Electric ने दिलेल्या माहितीनुसार, OLA Shakti मध्ये ऑटोमोटिव्ह-ग्रेड बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हे उत्पादन पूर्णपणे हवामान प्रतिरोधक आहे. विशेष म्हणजे वीज गेल्यानंतर कोणताही विलंब न होता लगेच बॅकअप सुरू होतो, त्यामुळे ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागणार नाही.
या उत्पादनाची सध्या ₹999 मध्ये प्री-बुकिंग सुरू असून, प्रत्यक्ष विक्री विविध क्षमतेनुसार वेगवेगळ्या किमतीत होणार आहे. घरगुती ग्राहकांसह शेतकरी आणि लघुउद्योगांसाठी हे उत्पादन उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक आणि इंधनमुक्त ऊर्जा पर्याय देण्याच्या दिशेने Ola Electric चा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यात घरगुती वीज वापराची पद्धत बदलू शकते, अशी चर्चा सध्या बाजारात सुरू आहे.
