Top News

ट्विंकल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनी द्रोण रत्न क्रीडा पुरस्काराने सन्मानित

ट्विंकल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनी द्रोण रत्न क्रीडा पुरस्काराने सन्मानित




नागभीड :  उत्तराखंड येथील हरिद्वार येथे एक्सीलेंट वर्ल्ड रेकॉर्ड स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे पुरस्कार सेरोमणी कार्यक्रम हरिद्वार स्पोर्ट स्टेडियमवर घेण्यात आले.

यामध्ये महाराष्ट्र मधून चंद्रपूर जिल्हातील ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीडच्या विद्यार्थ्यांनींची निवड करण्यात आली. खेळा मध्ये मार्शल आर्ट आष्टेडू आखाडा राष्ट्रीय खेळाडू म्हणून या विद्यार्थिनींना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. साक्षी गायकवाड, श्रेया सरपाते, नुपूर ननावरे या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यापूर्वीसुद्धा ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनीनीं आदिवासी खेळ रत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त केले आहे. सोबतच आंतरशालेय खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. शिक्षणासोबतच खेळामध्ये सुद्धा ट्विंकल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नेहमीच पुढे असतात. हे संपूर्ण महाराष्ट्र सह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याने बघितले आहे.

सदर विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी अभिनंदन करीत विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

तर विद्यार्थिनींनी या यशाचे श्रेय  क्रीडा शिक्षक गणेश लांजेवार, महेश जीभकाटे, रूपा ताडूरवार  यांना दिले आहे. सर्व स्तरातून विद्यार्थिनीचे कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post