प्रादेशिक परिवहन विभागातर्फे लायसन्स कॅम्प
चंद्रपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
- 26 मे रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा
- 27 मे रोजी एन. एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी
- 28 मे रोजी शासकीय विश्रामगृह, चिमुर
- 29 मे रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी
- 30 मे रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर
येथे लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
