नवखळा चे माजी नगरसेवक रुपेश गायकवाड आणि भाजपचे बूथ अध्यक्ष मंगेश यशवंतराव कावळे यांनी महीलाच्या समस्येचे केले तात्काळ निवारण
नागभीड : दी 23 में 2025 रोजी नवखळा येथील स्थानिकांनी स्थानिक माजी नगरसेवक रुपेश गायकवाड आणि भाजपा बूथ अध्यक्ष मंगेश यशवंतराव कावळे यांची भेट घेऊन घोडाझरी पाणी योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्ल्या पाईप लाईन ची जोडणी अद्यापही नवखळा येथील हनुमान मंदिर ते भजनकर यांचे घरा पर्यंत जोडणी झाली नाही याची माहिती दिली.
गावकर्यांनी माहिती देताच बूथ अध्यक्ष मंगेश यशवंतराव कावळे यांनी सदर बाब माजी नगरसेवक रुपेश गायकवाड यांना सांगितली. क्षणाचा ही विलंब न करता रुपेश गायकवाड यांनी पाहणी करून समबंधित विभागाला व ठेकेदाराला याची माहिती देऊन स्वतःच्या उपस्थितीत काम करून घेतलें. स्थानिकांनी माजी नगर सेवक रुपेश गायकवाड आणि भाजपा बूथ अध्यक्ष मंगेश यशवंतराव कावळे यांचे आभार मानले.