नागभीड तालुक्यातील घरकुल धारकांना 7450 ब्रास रेती मिळणार मोफत...आमदार भांगडिया यांच्या प्रयत्नांना यश....

नागभीड तालुक्यातील घरकुल धारकांना 7450 ब्रास रेती मिळणार मोफत...आमदार भांगडिया यांच्या प्रयत्नांना यश....




नागभीड  : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, मोदी घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना इत्यादी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाले. 

मात्र रेती घाट बंद असल्याने सदर घरकुल धारकांना अवैध रित्या रेती घ्यावी लागत होती. मात्र प्रशासण कारवाही करत असल्याने या रेतीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे घरकुलासाठी मिळणाऱ्या निधी मध्ये ही रेती घेणे शक्य नव्हते त्यामुळे घरकुल धारक नाल्याची दुय्यम दर्जाची रेती वापरत होते तर काहींनी तेही न मिळाल्याने अर्धवट बांधकाम झालेले केले.

 घरकुल धारकांची ही व्यथा लक्षात घेता शासनाने दोन महिन्या पूर्वी या घरकुल धारकांना मोफत रेती देण्याचे परी पत्रक काढले होते. पंचायत समिती नागभीड च्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायती नुसार तहसील प्रशासनाला लागणाऱ्या  रेतीचा अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु पावसाळ्याचे दिवस आले तरी एकाही घरकुल धारकाला रेती मिळाली नव्हती. समोर येणारा पावसाळा व घरकुल बांधकामात होणारी निकृष्ठ दर्जाच्या रेतीचा वापर बघता चिमूर विधानसभा क्षेत्राचे  आमदार यांनी ग्रामीण भागतील या घरकुल धारकांना योग्य दर्जाची रेती घाटाची रेती मोफत मिळावी यासाठी सात्यत्याने प्रयत्न केले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधत नागभीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्नेहल लाड, नागभीड तहसील चे तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याशी समन्वय साधत प्रत्येक घरकुल धारकाला मोफत रेती चा प्रश्न निकाली काढलेला असून आज पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

नागभीड तालुक्याला 7450 ब्रास एवढी रेती घरकुल धारकांना मिळणार आहे. यात पहिल्या टप्यात 1700 ब्रास रेती उपलब्ध होणार आहे. सदर रेती पुरवठा हा ब्रम्हपुरी तालुक्यातील तपाळ या रेती गटातुन केला जाणार आहे. तसे पत्र सुद्धा निघालेले आहे. त्यामुळे घरकुल धारका मध्ये आनंदाचे वातावरण आहे. व नागभीड तालुक्यातील सर्व घरकुल धारकांनी आमदार बंटी भांगडिया, महसूल प्रशासन, पंचायत समिती प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहे. सदर रेतीचा पुरवठा हा 15 दिवसात होणार आहे. व त्या साठी लागणारे ऑनलाईन पासेस या ग्रामपंचायती चे ग्रामसेवक यांच्या कडे देण्यात येणार आहेत.  त्या नुसार पंचायत समितीच्या गटविकास वन्यजीव यांच्या कडून व नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांना मुख्याधिकारी यांचेमार्फत आलेल्या लाभर्त्यांच्या यादीनुसार घरपोच पुरवठा केला जाणार आहे. या साठी कुठलाही स्वामित्वधन घेतले जाणार नाही आहे. तसेच तहसीलदार यांचे कडे सुद्धा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

त्यामुळे आमदार बंटी भांगडिया यांचे घरकुल लाभार्थ्यांनी आभार  मानले आहे.