समिधा सेवा संस्था द्वारे संचालित सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे वक्तृत्व स्पर्धेत सुयश......
▪️ महाविद्यालयाचे व पूजा चे सर्व स्थरातून होत आहे कौतुक
नागभीड :: समिधा सेवा संस्था द्वारे संचालित सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पूजा वीर हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे आयोजित वकृत्व स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकवून महाविद्यालयाच्या सन्मानात मोलाचा वाटा उचललेला आहे.
या यशा बद्दल समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्या डॉ. रेखा जीभकाटे नवखरे तसेच सर्व प्राध्यापक वृंदा व कर्मचारी वृंदानी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
या स्पर्धेत पूजा वीर ला रोख रक्कम दोन हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक पारितोषिक म्हणून मिळालेले आहे.या यशा बदल शहरातून महाविद्यालयाचे व पूजा चे कौतुक केले जात आहे.
