Top News

The annual sports festival was inaugurated with pomp at Twinkle English School Nagbhid.....

समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड  येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन थाटात संपन्न.....

 


नागभीड :: नागभीड येथील  श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट , ब्रह्मपुरी चे प्राचार्य सुयोग बाळबुधे सर तर अध्यक्ष स्थानी समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष  श्री. गणेश तर्वेकर , कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन समिधा सेवा संस्थेचे सचिव श्री.अजय काबरा , सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेखा जीभकाटे हे उपस्थित होते. यावेळी मंचावर स्कूल च्या प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर , मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नारनवरे उपस्थित होत्या. 


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर यांनी शालेय क्रीडा महोत्सवाच्या आयोजनामागील हेतु आणि मैदानी खेळाचे महत्व विषद केले .


महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी चे प्राचार्य सुयोग बाळबुधे सर यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी क्रीडा शिक्षक महेश जीभकाटे सर यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर मैदानवर विविध खेळ खेळा.


निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आणि शाळेचा वर्षभरातील खेळांचा आढावा सुद्धा सादर केला.  यावेळी सुयोग बालबुधे सर , गणेश तर्वेकर सर , अजय काबरा सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर खेळाणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Previous Post Next Post