Top News

सहदेवराव भोपळे कॉलेज मध्ये संपर्क सत्राला सुरुवात

 सहदेवराव भोपळे कॉलेज मध्ये संपर्क सत्राला सुरुवात




मनोज भगत (ता.प्र) तेल्हारा :: २९ सप्टेंबर २०२४,रविवार  रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सहदेवराव भोपळे कॉलेज मध्ये संपर्क सत्राचे "उदघाटन" तसेच विद्यार्थ्यांसाठी "अनुभवाचे बोल" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे  हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख उपस्थितीत नवलकुमार टावरी, सामाजिक कार्यकर्ते मधुकर वानखडे,प्राचार्य संतोषकुमार राऊत, प्रमुख मार्गदर्शक डॉ. शंकर दुनघव हे होते.यावेळी प्रा.दुनघव यांनी अनुभवाच्या बोल या सदरातून आपल्या करिअरच्या जडणघडणीचा प्रवास कथन केला. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.यावेळी आपल्या अध्यक्ष मनोगतात शामशील भोपळे यांनी प्रवेशित बी.ए व बी. कॉमच्या विद्यार्थ्यांनी नियमित संपर्क उपस्थित राहून स्पर्धा परीक्षेसाठी कठोर मेहनत घेणे,आजच्या स्पर्धात्मक युगात गरजेचे आहे. तसेच अनुभवाचे बोल या उपक्रमातून रविवारी आपले करियर घडवणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.या कार्यक्रमाचे संचालन प्रा.अक्षय ढोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.गणेश भोपळे यांनी केले. कार्यक्रमाला अभ्यास केंद्राचे समंत्रक, क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखंडे, सुनील धुरदेव, बहुसंख्य प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रवेशित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अभ्यासक्रमाचे पुस्तके वाटप करण्यात आली.

Previous Post Next Post