Top News

गळफास घेऊन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

गळफास घेऊन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.




आर्णी | हिरासिंग राठीड ता.प्र. :- आर्णी तालुक्यातील खेड (बिड) येथील शेतकऱ्यांने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला  कंटाळून आपल्या शेतामध्ये दोरीच्या सहाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १ ऑगस्टस रोज सकाळी १० वाजताच्या सुमारास खेड परीसरात उघडकीस आली,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव वंसता जेता राठोड वय 52 वर्षे रा.खेड असे असून मृतक शेतकऱ्याकडे  स्वतःच्या मालकीची चार एकर शेती असून,या शेतीवर सेंट्रल बँक व मध्यवर्ती बँकेचे अंदाजे एक लाख रुपये कर्ज आहेत.मृतक वसंता हा नेहमीच कर्जाच्या विवंचनेत राहत होता.गेल्या वर्षी झालेल्या नापिकीमुळे व बँकेच्या थकीत कर्जामुळे व खाजगी कर्ज न फिटल्याने तो नेहमी निराश राहत होता,त्यामुळेच त्यांने आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील नातेवाईकांनी सांगितले, आर्णी पोलिसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा करून शव उत्तरी तपासणीसाठी पाठविण्यात आले,मृतकाच्या मागे एक मुलगा,दोन मुली ,नात,नातू असा मोठा आप्त परिवार आहे,कुटुंबाचा कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली,पुढील तपासणी येथील जमादार अरुण चव्हाण करीत आहे.

Previous Post Next Post