Top News

Breaking News :: सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव तब्बल दोन लाखां पेक्षा अधिक मतांनी काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर विजयी.....

Breaking News :: सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव तब्बल दोन लाखां पेक्षा अधिक मतांनी काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर विजयी.....


अखेर नारी शक्ती ठरली भाजपाला घातक.... दिग्गज मंत्री मुनगंटीवार यांच्या दारुण पराभव 


प्रतिभा धारूरकर यांच्या ऐतिहासिक विजय 



चंद्रपूर ::  2019 च्या लोक सभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मे रोजी चंद्रपूर येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी 44 हजार 763 मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला होता.बाळू धानोरकर यांना पाच लाख 59 हजार 507 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांना पाच लाख 14 हजार 744 मते मिळाली होती. मात्र दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधना नंतर 2024 ला लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. धानोरकर यांच्या विरोधात भाजपा चे दिगंज नेते सुधीर मुनगंटीवार  हे प्रतिस्पर्धी होते प्रतिभा धानोराकर यांनी तब्बल दोन लाख 53 हजार 356  मतांनि मुनगंटीवार यांच्या  पराभव केला आहे. धानोराकर यांना सात लाख 42 हजार 08 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना चार लाख 50 हजार 852 मते मिळाली.



सविस्तर वृत्त असे आहे कि, चंद्रपूर लोकसभेची आज मंगळवारी दिनांक 4 जून 2024 ला सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा देशातील सर्व एक्झिट पोल ला झुंगारून  काँग्रेस हा अपेक्षेपेक्षा मोठी झेप घेतल्याचे दिसून आले. मागील लोकसभेत देखील महाराष्ट्रातून काँग्रेस चे एकमेव खासदार हे चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातून बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे निवडून आले होते.

 काँग्रेसची विश्वासार्हता असलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा अनेक मतमोजणी फेऱ्या अत्यंत रेकॉर्ड ब्रेक ठरल्याचे दिसून आलें आहे. 

यात शेवटी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर रेकॉर्डब्रेक मतांनी विजय झाले तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत पिछाडीवर पडले होते. सध्याच्या आकडेवारीनुसार धानोरकर दोन लाख 53 हजार 356 एव्हढ्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील अधिकृत आकडेवारीनुसार प्रतिभा धानोरकर या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रथम फेरीपासूनच आघाडीवरच असल्याचे पाहायला मिळाले.

प्रतिभा धानोरकर यांनी सकाळपासून प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवली आहे. यावरून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व विकासाचे दावे पूर्णपणे खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचे  चित्र स्पष्ट झाले. तर प्रतिभा धानोरकर विक्रमी मतांनी विजयी झाले. चंद्रपूर- वणी - आर्णी लोकसभा प्रतिभा धानोरकर यांच्या हातात गेले आहे हे मात्र स्पष्ट झाले आहे. शेवटी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट बघायला मिळत आहे.

Previous Post Next Post