विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा लाटेलवार कुटुंबियांना मदतीचा हात
सावली :: उपसंपादक | गौतम कांबळे |8605011881| :: स्थानिक सावली शहरातील वॉर्ड क्र.०५ येथे दुर्दर आजाराने लाटेलवार कुटुंबियातील दोन व्यक्तिचा लागोपाठ एका हफ्त्यामध्येच जीव हानी झाली,लाटेलवार कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार व नगरसेविका प्रियंका रामटेके यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, सावली येथील तरुण स्व.सोमनाथ बंडू लाटेलवार वय ३२ वर्षे हे काही दिवसापूर्वी तबेत बरी नसल्यामुळे दवाखान्यात भरती होते उपचारा दरम्यान ते मृत पावले, त्यानंतर दोन दिवसांनीच त्यांची आई स्व.कविता बंडू लाटेलवार ह्या सुद्धा प्रकृती अचानक खराब होऊन मृत पावल्या एकामागोमाग घरातील दोन जीव गमावल्याने लाटेलवार कुटुंबियावर मोठे संकट आले, स्व.सोमनाथ लाटेलवार व स्व.कविता लाटेलवार हे घरातील कमवते व्यक्ती होते,भूमिहीन व घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने उदर्निवाहासाठी जे मिडेल ते काम करून कुटुंब चालवीत होते,पण काळाने त्यांचावर घात केला,कुटुंबावर आर्थिक संकट आल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून लाटेलवार कुटुंबीयांना सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना नगरसेवक प्रफुल वाळके,अंतबोध बोरकर,नगरसेविका ज्योती शिंदे,सामाजिक कार्यकर्ता निखिल दुधे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते.
