नागभीड पोलिसांची मोठी कार्यवाही...
चार जनांवर गुन्हा दाखल....लिखोंचा मुद्देमाल जप्त......
नागभिड :: पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत दिनांक 05/05/2024 रोजी जनावरे कत्तल खान्यात कत्तली साठी नेत असल्याची गुप्त माहीती स्थानीक पोलिसांना मीळाली सदर गुप्त माहीतीच्या आधारे नागभीड येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकेबंदी करून अवैद्य जनावरे वाहतुकी संबंधाने वाहनांची तपासणी केली असता महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 1441 मध्ये एकूण 4 बैल, वाहन क्रमांक MH 36 AA 2811 मध्ये एकूण 4 बैल, क्रमांक MH 36 AA 2884 मध्ये एकूण 4 बैल असे एकुण १२ बैल आढळुन आले.
यातील आरोपी नामे ::
अक्सर सय्यद अली सय्यद वय 42 वर्ष रा. ब्रह्मपुरी. ता ब्रह्मपुरी
देवदास गोमाजी नेवारे वय 40 वर्ष रा. सुकडी ता. साकोली जि. भंडारा,
धनराज लक्ष्मण बडवाईक वय 40 वर्ष रा. पापडा ता. साकोली जि. भंडारा,
तोसिफ आसिक पठाण वय 22 वर्ष रा. पापडा ता. साकोली जि. भंडारा,
यांनी गौवंशीय जनावरे बैल वाहनात कोंबून, निर्दयतेने छळ करून, कत्तली करिता वाहतूक करून नेत असता मिळून आल्याने सदर गौवांशिय जनावरांना वैद्यकीय तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने गौशालेत दाखल करण्यात आले असून नमूद आरोपींन विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड, सपोनि पोटभरे, पोलीस अंमलदार अजीत, रोहित, व चा पोशी गजानन यांनी हि, कार्यवाही केली आहे.
