Top News

स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.......पेट्रोलिंग दरम्यान मुल येथे ३७ गोवंशासह १६ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त....

स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.......पेट्रोलिंग दरम्यान मुल येथे ३७ गोवंशासह १६ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त....

चंद्रपूर ::  पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचेचे आदेशान्वये  चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांना दिले. त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार स्थानीक गुन्हे शाखा, चंदपुर यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दिनांक 03/05/2024 रोजी रात्रो पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली - मुल मार्गे एक अवैधरीत्या कत्तलीकरीता जनावरे कोंबुन भरलेला ट्रक CG24-5-7667 हा चंद्रपुर कडे येणार आहे.  



सदर गोपनीय माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन मुल हद्दीत रेल्वे गेट जवळ नाकेबंदी केली असता एक ट्रक रेल्वे गेट कडे येतांना दिसला त्यास थांबविण्यास सांगितले असता ट्रक रोडच्या बाजुला थांबला तितक्यात ट्रकमधील दोन ईसम अंधाराचा फायदा घेउन जंगलाकडे पळुन गेले. त्यांचा शोध घेतला असता मिळुन आले नाही. 

ट्रक ड्रायव्हरला खाली उतरवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने आपले नाव नईमउद्दीन करीमउद्दीन शेख वय 39 वर्षे रा. शांतीनगर, घुग्घुस ता.जि. चंद्रपूर  असे सांगितले. व पळून गेलेले ईसम हे 1) असलम शेख 2) इर्शादउल्ला खान दोन्ही राह. मुर्तिजापुर जि. अकोला असे सांगितले. तसेेेच सदर जनावरे कुरखेडा घाट जि. गडचिरोली येथुन आणले असुन सादिक खान रा. गडचांदुर याने आणण्यास सांगितले असल्याचि माहिति  चालकाने दिलि. सदर ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये गोवंश जातीचे गाय, बैल. गुरे जातीचे जनावरे निर्दयतेने पाय बांधुन कोंबुन असल्याचे दिसले तसेच त्यामध्ये काही जनावरे मृत असल्याचे दिसले. महाराष्ट्रात जनावरे कत्तल करणे, कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणेस प्रतिबंध असतांना सुध्दा सदर जनावरे कत्तलीसाठी ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून कुरतेने निर्दयतेने अवैधरीत्या वाहतुक करीत तेलंगणा राज्यात नेत असल्याचे समजले. सदर ट्रकमध्ये एकुण 37 गोवंश जनावरे त्यामध्ये 4 मृत जनावरे व वाहन किंमत एकुण 16,50,000/-रु (सोळा लाख पन्नास हजार) चा माल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस घटनास्थावरून ताब्यात घेउन आरोपीस पुढील तपासाकरिता पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले.

 तसेच वाहनामधील 33 जिवंत गोंवंश जनावरे यांची देखरेख करण्याकरीता प्यार फाउंडेशन दाताळा रोड, चंद्रपूर येथे जमा करण्यात आले. व 4 मृत गोवंश जनावरांचा पंचासमक्ष पशुवैद्यकिय अधिकारी चंद्रपूर यांचे कडुन पोस्टमार्टग करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले.

सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ऐकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे, चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.

Previous Post Next Post