बल्हारशाह पोलिसांची मोठी कारवाई....4 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त....
बल्हारशाह / गौतम कांबळे - उपसंपादक :: चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी आणि विक्रीवर बंदी घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये जिल्हा गुन्हे शाखेने चंद्रपूर शहरात 30 एप्रिल आणि 1 मे रोजी 2 कारवाया केल्या आहेत. 1 मे 2024 रोजी रात्री 8 वाजता बल्हारशाह पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्यामध्ये बसस्थानक बल्हारशाह परिसरात तपासणी दरम्यान 5 पिवळया प्लॉस्टीक चुंगडी मध्ये 4 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या कारवाईत दिनेश नरसैया अंबाला 27 रा. दादाभाई नौरोजी वार्ड बल्हारशाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनात बल्हारशाह पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, वशिष्ठ रंगारी, श्रिनिवास वाभिटकर इतर पोलीस पथकाने केली आहे .

