सुरज ठाकरे यांच्यावतीने पारंपारिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालय समोर बुंदी व शरबत चे होनार वाटप....
चंद्रपूर \ राजुरा : मनोज श्रीहरी गोरे :: उपजिल्हा प्रतिनिधि
आम आदमी पार्टी, जि. चंद्रपूर चे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्यावतीने आम आदमी पार्टी राजुरा तर्फे
संकट मोचक पवनपुत्र हनुमान की जय', 'जय श्रीराम' असा जयघोष करत मंगळवार दि. 23 / एप्रिल/2024 रोजी शहरात पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालय समोर बुंदी व शरबत चे वाटप करण्याचे आयोजिले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रामधील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, तथा जनसामान्यांच्या गंभीर समस्यांचे निवारण करण्याकरिता सुरज ठाकरे यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या जनतेप्रती ची भूमिका ही नेहमीच संकट मोचक सारखीच असल्याने राजुरातील स्थानिक आजी- माजींकळे ज्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत अशा निराश झालेल्या नागरिकांच्या समस्या सुरज ठाकरे यांनी वेळोवेळी मार्गी लावल्या असल्याने त्यांच्या याच कामाच्या आधारावर राजुरा येथील जनतेचं स्वप्न हे सुरज ठाकरे यांना येत्या विधानसभा
निवडणुकीत आमदार म्हणून बघण्याचे झाले असल्याने जनतेच्या आग्रहास्तव निश्चितच निवडणुकीच्या रणांगणात सुरज ठाकरे उतरतील हे निश्चित. या पर्वाची सुरुवात ही हनुमान जयंती च्या पावन पर्वा वर बुंदी व शरबत चे वाटप करून करण्यात येत आहे.
