आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात नागभीड तालुक्यात भाजपा-महायुतीची ‛भव्य दुचाकी मिरवणूक’ उत्साहात संपन्न....
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचे विविध ठिकाणी जंगी स्वागत, जनतेचा प्रचंड प्रतिसाद....
‛अब की बार ४०० पार’ च्या गजरात नागभीड तालुका दुमदुमला
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड :: मुख्यसंपादक तथा संपादक | पराग सुरेश गुंडेवार |
काल दि.१५ एप्रिल ला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यात ‛भव्य दुचाकी मिरवणूक’ मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी तालुक्यातील विविध देवस्थान, श्री गुरुदेव सेवा मंडळ, बुद्ध विहार येथे भेटी देऊन दर्शन घेतले. सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करुन स्थानिक नागरिकांशी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेत सर्वाना आश्वस्त केले.
तसेच, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्याकरिता आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी येत्या १९ तारखेला ‛कमळ’ चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण केले व पुष्पगुच्छ भेट देऊन वाजत_गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या दुचाकी मिरवणूकी मध्ये नागभीड तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले), रासप व महायुतीचे विविध नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला.
नागभीड शहरासह ग्रामीण भागातील समस्त जनतेनी आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात निघालेल्या बाईक रॅली ला उदंड प्रतिसाद दिला. तसेच, स्थानिक महिला-भगिनी, युवक-युवती, चिमुकल्यांनी सुध्दा आमदार बंटी भांगडीया यांनी आपुलकीने छायाचित्रण केले व जोशपूर्ण वातावरणात ‛अब की बार ४०० पार’ असा प्रचंड प्रमाणात जयघोष केला.
या दुचाकी मिरवणुकी ला नागभीड शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयातून प्रारंभ होऊन नवखळा-डोंगरगाव-कटाळया मारोती-कुनाघडाचक-मोहाळी-बनवाही-कोटगाव-तेलीमेंढा-म्हसली-विलम-चीकमारा-बाळापूर-पान्होळी-मेंढा-किरमीटी-पारडी-कोर्धा-नवेगाव-मिंथुर-मिंडाळा-बागलमेंढा-बोंड-देवपायली-बाळापूर-गायमुख-आकापूर-उसराळमेंढा-वाढोणा-तुकम-चिखलगाव-गिरगाव-तळोधी (बा.) व अन्य गावांतून मार्गक्रमण करत नागभीड येथे पोहचल्यानंतर दुचाकी मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.
बातमी, जाहिरात,लेख,चारोळी करीता संपर्क :: मुख्य संपादक तथा संपादक :: पराग सुरेश गुंडेवार 8668781673





